सुजलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

भूषण अहिरे 
सोमवार, 7 जून 2021

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील पेटले या गावामध्ये सुजलॉन कंपनीच्या पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि या पवनचक्क्यांच्या अर्थिंगची वायर मध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एका शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.

धुळे - साक्री Sakri तालुक्यातील माळमाथा परिसरातील पेटले या गावामध्ये सुजलॉन कंपनीच्या Suzlon company पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि या पवनचक्क्यांच्या अर्थिंगची वायर मध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एका शेतकऱ्याचा Framer शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. Farmer dies on the spot due shock 

पंचवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सुजलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे परिसरातील नागरिकांना समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकाणाहून तरुण शेतकऱ्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

ओपन स्काय करारातून रशिया पडला बाहेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुजलॉन  कंपनीच्या कार्यालयामध्ये मृतदेह आणून ठेवला. जोपर्यंत सुजलॉन कंपनी कडून या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत मृत शेतकऱ्याचा मृतदेह कार्यालयातून ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. कंपनीच्या परिसरातच मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनाला बसले. Farmer dies on the spot due shock 

 हे देखील पहा -

पोलीस प्रशासनास यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकारी घटनेचा संपूर्ण तपास करून पुढील कारवाई पोलिसांमार्फत केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live