Milk Business
Milk Business

मावळातील शेतकरी विकतोय दिवसाला चारशे लिटर दूध..(पहा व्हिडिओ)

मावळ : इंद्रायणी Indrayani भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात आता शेतकरी दुधाच्या Milk व्यवसाय कडे वळलेली दिसतात. मावळात कोरोना काळात दुधाला मोठी मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. Farmer in Maval Selling Four Hundred liters of milk per day

मावळ मधील शेतकरी Farmers शेती करीत होते. गेल्या दशकापासून म्हशीच्या दुधाला मागणी वाढल्याने मावळातील शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहेत त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोना Corona मुळे सर्व कंपन्या,आय टी पार्क, दुकाने सर्व बंद आहे. व्यवहार ठप्प झाला मात्र दुधाचा व्यवसाय खूप तेजीत आहे. त्यामुळे दुधाला मागणी वाढली असून दुधाचे दर वाढले आहेत. सध्या म्हशीच्या दुधाला Buffallow Milk ५५ रुपये लिटर प्रमाणे दर मिळत आहे. दुधाला वाढलेली मागणी व वाढत्या बाजार भाव मुळे शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी चांगले दिवस आले आहेत. 

पूर्वी दुधाला मागणी कमी असल्याने हा व्यवसाय केवळ शेतीला जोडधंदा म्हणून केला जात होता. परंतु, सध्या दुधाला मागणी वाढल्याने चांगले पैसे कमावण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. थोड्या खर्चात व कमी कालावधीत चांगले पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय असल्याने मावळातील शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळले आहेत. Farmer in Maval Selling Four Hundred liters of milk per day

मावळातील साळुंबरे गावचे शेतकरी दिलीप राक्षे यांच्याकडे ऐशी म्हशी आहेत. दिवसाला ह्या म्हशी चारशे लिटर दूध देतात. दुधाला पंचावन्न रुपये भाव आहे. दिवसाला वीस हजाराचे दूध राक्षे विकतात. दिवसाला चारा, खुराक, कामगारांचा पगार धरून त्यांना पंधरा हजार रुपये खर्च येतो.

रोज त्यांना सुमारे पाच हजारांचा नफा होतो. महिन्याकाठी त्यांना दीड लाख रुपयाचा त्यांना निव्वळ नफा होतो. यात आम्ही समाधानी असल्याचं दिलीप राक्षे यांनी सांगितलं. नागरिक शेती करीत नाहीत, बँकेचे कर्ज काढून मोठमोठ्या कंपन्या काढतात. व्याज भरत राहतात. मात्र असे कोरोना सारखे गंभीर आजार आला तर सर्व व्यवहार ठप्प होतो. मात्र दूध व्यवसाय बंद पडत नाही. त्यामुळे कोरोनातही दुधाला सोन्याचे दिवस आले आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com