दूध दरवाढीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन... 

भारत नागणे
गुरुवार, 10 जून 2021

गाईच्या दुधाला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रती लिटर दर मिळावे. यामागणीसाठी पंढरपूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील एकलासपूर  या ठिकाणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे

पंढरपूर : गाईच्या दुधाला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रती लिटर दर मिळावे. यामागणीसाठी पंढरपूर Pandharpur- विजयपूर Vijaypur या राष्ट्रीय महामार्गावरील एकलासपूर Eklaspur या ठिकाणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शेतकर्यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या Government प्रतिकात्मक पुतळ्याला दूधाचा अभिषेक घालून चाबकाचे फटके दिले आहेत. Farmers agitation for milk price hike

लाॅकडाऊन Lockdown काळात दूधाचे दर Rate पडले आहेत. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढले आहेत, तर दुसरीकडे दूधाचे दर मात्र घसरले आहेत. याचा आर्थिक फटका राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना Farmers बसला आहे. सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांन मधून संताप व्यक्त केला जात आहे.  

दूध दरात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हीच मागणी घेवून रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात दूध दरवाढ आंदोलन केले आहे. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. रयत क्रांती संघनेचे कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येत. Farmers agitation for milk price hike

पीक विमा भरपाई करिता पुसद येथे भाजपा कडून रास्तारोको आंदोलन

पंढरपूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन केले आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सुमारे १०० लिटर दूधाचा अभिषेक घालून त्या पुतळ्याला शेतकऱ्यांनी चाबकाचे पटकारे मारले आहेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून दूध दरात वाढ करावी अशी मागणी केली आहे. सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. 

हे देखील पहा 

पोलिसांनी Police वेळीच हस्तक्षेप करत सरकारचा पुतळा ताब्यात घेतला. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दूध दरवाढी संदर्भातील लेखी निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. Farmers agitation for milk price hike

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live