मजुरांअभावी भंडारा जिल्ह्यातले शेतकरी आले अडचणीत

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

भंडारा जिल्ह्यात शेतात कामाला मजूर मिळेनासी परिस्थिती निर्माण झाली असून बाहेरुन 30 ते 40 किलो मीटर वरुन मजूर आण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

भंडारा :  भंडारा जिल्ह्यात शेतात कामाला मजूर मिळेनासी परिस्थिती निर्माण झाली असून बाहेरुन 30 ते 40 किलो मीटर वरुण मजूर आण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे मजुरीचा दरही दुप्पट झाला आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचा खर्च ही वाढला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात शेतात सध्या रब्बीच्या कामांसोबतच गहु (Wheat) कापणीला सुरूवात झाली आहे.

मात्र शेतात कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यात दिसून येत आहे.  मजुरांकडून दुप्पट मजुरीची मागणी केली जात आहे. त्यासोबतच तब्बल 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून आपल्या शेतात मजूर आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  

त्यासाठी लागणारा वाहतूक खर्च देखील शेतकरी (Farmers) करत असल्याने, त्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. आवकाळी पाऊस व जंगली प्राण्यांनी शेतातील गहु आडवे केल्याने, जो गहु  काढण्यासाठी एका दिवसाचा कालावधी लागायचा तिथे दोन दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा गहु शेतीत तोटा झाल्याचे शेतकरी सांगत असून 50 टक्क्यावरून नफा 15 ते 20 टक्कावर आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live