बर्ल्ड फ्लूची भीती दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक, नंदूरबार, परभणी, भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

साम टीव्ही
रविवार, 31 जानेवारी 2021
  •  
  • बर्ल्ड फ्लूची भीती दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक
  • शेतकऱ्यांकडून कमी दरात पक्ष्यांची खरेदी
  • नंदूरबार, परभणी, भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

बर्ड फ्लूनं महाराष्ट्रात शिरकाव केला आणि पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांवर संकट कोसळलं. अनेक शेतकऱ्यांनी काळजी घेतली. पण, तरीही त्यांना भीती दाखवून लूट केल्याचा प्रकार समोर आलाय. कोण करतोय पोल्ट्री व्यावसायिक, शेतकऱ्यांची लूट वाचा सविस्तर

बर्ल्ड फ्लूनं महाराष्ट्रात शिरकाव केला आणि चिकन आणि अंड्यांच्या दरात घसरण झाली. पोल्ट्री फार्म व्यावसायिकांवर संकट कोसळलं. त्यात धक्कादायक बाब म्हणजे बर्ल्ड फ्लूच्या संकटाची भीती दाखवून शेतकऱ्यांकडून कमी दरात पक्षी खरेदी केले जातायत...हा सगळा प्रकार, परभणी, भंडारा आणि नंदूरबारमध्ये समोर आलाय. त्यामुळे कुक्कुटपालन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतंय.

बर्ड फ्लूच्या भीतीपोटी चिकन आणि अंड्यांच्या विक्रीत कमालीची घट आलीये. खरेदी कमी होत असल्याने दरांमध्येही घसरण सुरूय. सध्या किती दराने कोंबडी आणि अंडी विकली जातायत पाहा-

पोल्ट्री फार्म चालक आर्थिक संकटात

 

  • 120 ते 140 रुपये नग विकली जाणारी कोंबडी 50 ते 60 रुपये नग विकली जातेय
  • 170 रुपये दर असलेल्या अंडीच्या ट्रेला आता 130 रुपये इतका दर मिळतोय
     

व्यापारी मागेल त्या भावात कोंबड्याची विक्री करावी लागतेय. त्यामुळे कोंबड्यांवरचा खर्च आणि गुंतवणूक निघणं अवघड झाल्याचं सांगितलं जातंय.

तर भंडाऱ्या जिल्ह्यातही पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास सात लाखाच्यावर कोंबड्या आहेत. बर्ड फ्ल्यूच्या अफवेमुळे 120 ते 140 रुपये नग विकल्या जाणारी कोंबडी 50 ते 60 रुपये नग विकल्या जात आहेत. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून व्यावसायिकाला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागतंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live