शेतकऱ्यांनो खरीपाच्या पेरणीला घाई करु नका

रोहिदास गाडगे
शुक्रवार, 11 जून 2021

ज्या शेतकऱ्यांनाकडे मुबलक पाणी, सिंचनाची सोय असेल अशाच शेतकऱ्यांनी 15 जुननंतर पेरणी करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगेपाटील यांनी केले आहे.

पुणे - यंदा मान्सूनचे आगमन लवकर होत असुन समाधान कारक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडुन देण्यात आला आहे. याच अंदाजांवर शेतकरी Farmers खरीपाच्या पेरणीची तयारी करत असतो. मात्र अनेक वेळा पाऊस निघून जातो. यामुळे शेतकऱ्यांवर Farmers दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावते. Farmers, do not rush to sow kharif

यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला घाई करू नये. असे केल्यास त्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती आहे. ज्या शेतकऱ्यांनाकडे मुबलक पाणी, सिंचनाची सोय असेल अशाच शेतकऱ्यांनी 15 जुननंतर पेरणी करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगेपाटील यांनी केले आहे.

हे देखील पहा - 

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात मान्सुन पुर्व पावसाचे आगमन मागील आठ दिवसापासुन झाले आहे.  काही भागात शेतीच्या मशागतीचे कामे अंतिम टप्यात आले आहे.  खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना बियाणे खते शेताच्या बांधावर मिळण्यासाठी कृषी विभागाची तयारीही पुर्ण झाली आहे. यंदा मान्सुन लवकर दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी तो मॉन्सूनपूर्व आहे. यामुळे खरीप पिकांची पेरणी करण्याची घाई धोकादायक ठरू शकते असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे..

सध्या पाऊसाचा जोर असला तरी पुढील काळात अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती असते.  त्यामुळे ज्या भागात मुबलक पाणी, सिंचन व्यवस्था आहे. अशाच  शेतकऱ्यांनी पेरणी करावी. उर्वरीत शेतकऱ्यांनी मुबलक पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन उपविभागिय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगेपाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

यंदा मान्सूनचे आगमन लवकर होत असुन समाधान कारक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडुन देण्यात आला आहे. याच अंदाजांवर शेतकरी खरीपाच्या पेरणीची तयारी करत असतो. मात्र अनेक वेळा पाऊस निघून जातो. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावते. 

अजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा

यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला घाई करू नये. असे केल्यास त्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती आहे. ज्या शेतकऱ्यांनाकडे मुबलक पाणी, सिंचनाची सोय असेल अशाच शेतकऱ्यांनी 15 जुननंतर पेरणी करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगेपाटील यांनी केले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात मान्सुन पुर्व पावसाचे आगमन मागील आठ दिवसापासुन झाले आहे. काही भागात शेतीच्या मशागतीचे कामे अंतिम टप्यात आले आहे. खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना बियाणे खते शेताच्या बांधावर मिळण्यासाठी कृषी विभागाची तयारीही पुर्ण झाली आहे. यंदा मान्सुन लवकर दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी तो मॉन्सूनपूर्व आहे. यामुळे खरीप पिकांची पेरणी करण्याची घाई धोकादायक ठरू शकते असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे..

सध्या पाऊसाचा जोर असला तरी पुढील काळात अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती असते.  त्यामुळे ज्या भागात मुबलक पाणी, सिंचन व्यवस्था आहे.  अशाच  शेतकऱ्यांनी पेरणी करावी. उर्वरीत शेतकऱ्यांनी मुबलक पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन उपविभागिय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगेपाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

Edited By - Puja Bonkile 

संबंधित बातम्या

Saam TV Live