लॉकडाऊन मुळे पॉली हाऊस मधील चायनीज शेती करणारे शेतकरी अडचणीत

दिलीप कांबळे
शुक्रवार, 21 मे 2021

कोरोना मुळे तळेगाव दाभाडे येथील आंबी मधील उच्चशिक्षित युवा शेतकरी अनिकेत मांढरे यांची चायनीज शेती अडचणीत आली आहे. लोक लॉक डाऊन मध्ये सर्व हॉटेल बंद असल्याने चायनीज पिकाला कोणतीही मागणी नाही.

मावळ : कोरोना Corona मुळे तळेगाव दाभाडे Talegaon Dabhade येथील आंबी Ambi मधील उच्चशिक्षित युवा शेतकरी अनिकेत मांढरे यांची चायनीज शेती अडचणीत आली आहे. लॉकडाऊन Lockdown मध्ये सर्व हॉटेल बंद असल्याने चायनीज पिकाला कोणतीही मागणी नाही. पॉली हाउसचे भाडे कामगारांचा पगार, औषधे यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आलेला. Farmers of doing Chinese Agriculture in Polyhouse in trouble due to lockdown

केल, रोमिन, बटरेड, अर्गोला, स्पॅनिश, झुकिनी, यासारखे अनेक चायनीज Chinese भाज्या या पॉलीहाऊसमध्ये तयार करण्यात आल्या आहे. दहा गुंठ्यात हे पॉली हाऊस तयार करण्यात आले.

 हे देखील पहा -

नुकतीच दोन वर्ष पूर्वी बीएससी ऍग्री ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या या युवा शेतकऱ्याने आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने प्रथमच मावळातील तळेगाव दाभाडे येथील आंबी मध्ये चायनीज शेती Chinese Agriculture करण्याचे ठरवले होते. 

म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

मात्र सुरुवातीपासूनच लॉक डाऊन असल्याने यांनी केलेल्या या उपक्रमावर पाणी फिरले दिसत आहे. मायबाप सरकार यांनी काहीतरी दाखल घेऊन निर्णय घ्यावा आणि लॉक डाऊन उठावं अशी अपेक्षा अनिकेत यांनी केली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live