Breaking | Nashik | कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं

अभिजीत सोनावणे
सोमवार, 2 मार्च 2020

नाशिकमध्ये कांदा आंदोलन पेटलंय. अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. निर्यातबंदी उठवल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत. 

नाशिक : लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सकाळी कांदा लिलावात कमी भाव पुकारल्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कांदा उत्पादकांनी कांदा लिलाव बंद पाडले.

नाशिकमध्ये कांदा आंदोलन पेटलं

 

 

अंदरसुलला संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले

 

लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांदा आवक होती. सकाळी नऊ वाजता कांदा लिलाव सुरू झाले. परंतु सकाळी 1 हजार वाहनातील कांदा 1652 रूपये व सरासरी भाव 1400 रूपये  कांदा भाव जाहीर होताच हे लिलाव बंद पाडण्यात आले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून कांदा निर्यात बंदी उठवली. मात्र याबाबत नोटिफिकेशन निघाले नाही. त्यामुळे संतप्त कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडले.

हे ही पाहा - लाल कांद्याचा रस केसांना लावला तर केस येतात ?

संतप्त कांदा उत्पादकांकडून कांदा लिलाव बंद

सटाणा - बाजार समितीमध्येही अर्धा तास लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदी उठविण्यासंदर्भात केंद्र शासनाने तत्काळ अधिसूचना जारी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले. निर्यातबंदी उठवून अधिसूचना जारी केली नाही तर कायमस्वरूपी लिलाव बंद करून तीव्र आंदोलनाचा शेतकरी संघटनांचा इशारा देण्यात आलाय. 

 हे पाहा - कांद्या उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा

हे पाहा - कांदा पिकातून तब्बल साडेपाच लाखांचा फायदा

 

 

WEB TITLE- Onion auction closed by angry growers in Nashik farmer protest andolan maharashtraसंबंधित बातम्या

Saam TV Live