VIDEO | दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळलं, पोलिस आणि आंदोलक आमने-सामने, वाचा काय घडलं?

साम टीव्ही
मंगळवार, 26 जानेवारी 2021

शेतकरी आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकार याच दिवसाची वाट पाहत होतात का? असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटवरून विचारलाय.

दिल्लीत विविध ठिकाणाहून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात आंदोलक शेतकरी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. संजय गांधीनगर, टिकरी बॉर्डर, ट्रान्सपोर्ट नगर तसंच कर्नाल बायपासवर पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. त्यानंतर या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे गेले काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेलं आंदोलन आज चिघळल्याचं पहायला मिळालं.

 

संजय राऊतांचा सरकारला सवाल

शेतकरी आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकार याच दिवसाची वाट पाहत होतात का? असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटवरून विचारलाय.

नाना पटोलेंचा आंदोलनाला पाठिंबा 

मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी मोर्चाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जर गरज पडली तर पदाची खुर्ची खाली करून शेतकऱ्यांसोबत उतरेन अशी भावना नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. दरम्यान नाना पटोले यांनी राज्यपालांवरही टीका केली असून राज्यपालांबद्दल मी काही बोलू शकत नाही ,पण ते कोणाच्या इशार्यावर चालतायत ते सगळ्या जगाला माहिती आहे. असंही पटोले म्हणालेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live