शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे

Rajendra shingne
Rajendra shingne

बुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे Rajendra Shingne आले होते. त्यावेळी बोलताना, शेतकऱ्यांनी कर्ज माफी होईलच या आशेवर राहू नये असे वक्तव्य त्यांनी केले आहे. Farmers should not hope for debt waiver Dr.Rajendra Shingane

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार Government महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. हि कर्जमाफी जाहीर करत असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा दोन लाखापर्यंतची रक्कम जमा केली होती.

मात्र ही रक्कम जमा करत असतानाच कोरोनाचे Corona संकट देशासह महाराष्ट्रावर Maharashtra आले. या कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि अनेक उत्पन्नाचे मार्ग मागील दिड ते दोन वर्षांमध्ये बंद आहे.

राज्याच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई निर्माण झाली आहे त्यामध्येच केंद्राकडून जीएसटीची GST रक्कम सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे राज्यामध्ये आर्थिक टंचाई निर्माण झाल्यामुळे आपण राज्य सरकारची इच्छा असतानासुद्धा शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची मंजूर केलेली कर्ज Loan माफी आपण पूर्णपणे देऊ शकलो नाही.

राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईल तेव्हा कर्जमाफी करण्यात येईल. परंतु सध्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल, त्यामुळे बँकेचे कर्ज भरायचे नाही, थकीत राहायचे या मानसिकतेमध्ये राहू नये असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

या परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी कर्जमाफी होईल या आशेवर आहेत व ते कर्ज भरत नाहीत. त्यामुळे ते कर्ज घेण्यासाठी पात्रही होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयातील २२ ते २४ हजार शेतकरी कर्जमुक्ती पासुन वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना सुध्दा बँकेकडून पीक कर्ज मिळावे यासाठी योग्य ती मदत करण्यात यावी अश्या अनेक अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यानी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण कथने, पीआरपो संतोष लोखंडे, संभाजी आप्पा पेटकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com