वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने युवा पत्रकाराची नैराश्यातून आत्महत्या... 

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

सोलापूरच्या प्रकाश जाधव या युवा पत्रकाराने राहत्या घरीच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डाव्या हाताची नस कापून प्रकाश ने आत्महत्या केली.

सोलापूर: सोलापूरच्या solapur प्रकाश जाधव या युवा पत्रकाराने Journalist राहत्या घरीच आत्महत्या Suicide केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डाव्या हाताची नस The vein of left hand कापून प्रकाश ने आत्महत्या केली.

सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. आणि त्याने अनेक दैनिकांमध्ये काम देखील केलेले आहे. सद्य तो सोलापूर मधील सुराज्य या दैनिकात पत्रकाराचे काम करत होता. तसेच तो सोलापूर विद्यापीठाच्या Solapur University मास कम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी देखील होता. 

प्रकाश जाधव यांच्या वडिलांचा Father कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्यावर काल (गुरुवारी) अंत्यसंस्कार होणार होते. मात्र आपल्या पित्याच्या मृत्यूच्या बातमीने  खचलेल्या मुलाने स्वतःचीच जीवनयात्रा त्या अगोदरच समाप्त केली. 

प्रकाशची आई आणि  वाहिनी दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होते. त्यामुळे त्यांच्यावर ही सोलापुरातील हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत. घरातील सगळ्या व्यक्तींना कोरोनाची लागणं झाल्याने प्रकाश आणि त्याचा भाऊ सतीश हे दोघंही विलगीकरणात राहत होते. मात्र मानसिक मनोबल खचलेल्या प्रकाशने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. Father dies due to Corona and his journalist son committed suicide in Depression 
 
प्रकाश याने डाव्या हाताची नस कापल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला त्वरित सिव्हिल हॉस्पिटलमध्ये civil hospital दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. त्याचा भाऊ सतीश जाधव हा सोलापूर शहर पोलीस Police दलात कार्यरत आहे. प्रकाश जाधव सारख्या हरहुन्नरी युवा पत्रकाराने आत्महत्या केल्याने सोलापुरातील पत्रकारांमधून हळहळ व्यक्त केली जातं आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live