PPE किट आणि त्यामुळे कोरोना योध्यांच्या समस्या

साम टीव्ही
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

 

  • PPE किटमुळे डॉक्टरांचं वजन होतंय कमी ? 
  • PPE किटमुळे कोरोना योध्यांना येतोय थकवा?
  • कोरोना योध्यांसमोर नवं आव्हान 

कोरोनाविरोधातल्या लढ्यात पीपीई किट महत्वाची भूमिका बजावत असले तरी कोरोना योद्ध्यांसमोर एक नवं आव्हान उभं राहिलंय. ते म्हणजे वजन कमी होण्याचं...खरंच पीपीई किट घातल्यानं वजन कमी होतंय का? पीपीई किटमुळे कोविड योध्यांसमोर नेमक्या कोणत्या अडचणी उपस्थित होतायेत.

कोरोनाचं संकट आल्यानंतर डॉक्टरांसह सर्वच कोरोना योध्यांसमोर मोठं आव्हान होतं ते स्वरक्षणाचं. अशा संकटात PPE किटनं मोठी भूमिका बजावलीय. मात्र हेच PPE किट आता डॉक्टर तसच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागलेत. पीपीई किटमुळे अनेकांच्या वजनात घट झालीय. शिवाय सतत अंगावर किट असल्यामुळे डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना थकवा येणं, गुदरमरल्यासारखं वाटणं असे त्रासही वाढू लागलेत. त्यामुळे कोरोना संकटातून बचाव झाला तरी आरोग्याच्या इतर तक्रारींचं काय हा मोठा प्रश्न या कोरोना योध्यांसमोर पडलाय. 

काय आहेत कोविड योध्यांच्या तक्रारी ?
पीपीई किट घातल्यानं खाण्या-पिण्याच्या वेळेत बदल झालाय. त्याचा थेट परिणाम कोविड योध्यांच्या आरोग्यावर होतोय. पीपीई किटमुळे अनेकांना थकवा जाणवतोय. पीपीई किटमुळे सतत येणारा घाम ही सर्वात मोठी समस्या आहे. घामामुळे त्वचेचे रोग होण्याची भीतीही त्यांच्यात आहे. शिवाय किट घातल्यानं चालण्या-फिरण्याच्या सवईतही बदल झालाय. 

पीपीई किटमुळे अनेकांचं वजन कमी झालं, अनेकांची कंबर बारीक झाल्याचं कोविड योध्ये सांगतायेत. वजन कमी होणं ही चांगली गोष्ट असली तरी सतत येणारा थकवा, शरीरातील पाण्याची कमतरता, खाण्या-पिण्याच्या बदलल्या वेळा आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. बऱ्याच जणांना पीपीई किट घालून 8 ते 10 तास काम करावं लागतंय. त्यामुळे हे किट कोविड योध्यांचं कोरोनापासून रक्षण करत असलं तरी इतर विकार त्रासदायक ठरू शकतात. याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live