ऊसाच्या शेतात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये उडाली खळबळ

संतोष जोशी
शुक्रवार, 4 जून 2021

नांदेड जिल्ह्यात Nanded District ऊसाच्या Sugarcane शेतात बिबट्या leopards आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नांदेड -  नांदेड जिल्ह्यात Nanded District ऊसाच्या Sugarcane शेतात बिबट्या leopards आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यामधील डोंगरगाव येथील शेतकरी केशवराव पाटील यांच्या ऊसाच्या फडात बिबट्या आढळून आला आहे. 

हे देखील पहा - 

काल रात्री शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करण्याकरिता जात असतांना ट्रॅक्टरच्या हेडलाईटलामुळे ऊसाच्या फडातून बाहेर पडताना बिबट्या दिसून आला आहे. 

आशियातील 'हे' गाव आहे जुळ्या मुलांचे गाव; शास्त्रज्ञही हैराण

या बिबट्याचा परिसरात वावर आढळल्याने परिसरातील शेतकरी दहशतीखाली आले आहेत. सध्या खरीपाची तयारी  सुरु असल्याने शेतकरी बिबट्याच्या भितीने शेतात जायला भित आहेत . दरम्यान, वनविभागाने बिबट्या पकडून जंगलात सोडण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

 

Edited By - Puja Bonkile 


संबंधित बातम्या

Saam TV Live