कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूची साथ पसरण्याची भीती, स्वाईन फ्लूचा नवा अवतार समोर

साम टीव्ही
मंगळवार, 30 जून 2020
  • चीनमध्ये सापडला नवा व्हायरस, 
  • कोरोनानंतर नवी साथ पसरण्याची भीती
  • स्वाईन फ्लूचा नवा अवतार

कोरोनाची साथ अद्याप आवरत नाही, तोवर चीनमध्ये नव्या साथीची चाहूल लागलीय. चिनी संशोधकांना नव्या विषाणूचा शोध लागला असून मानवी शरीरात त्याचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच चीनमध्ये आणखी एक नवा व्हायरस सापडल्याचा दावा संशोधकांनी केलाय. 2009 मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जैविक वारसदार असलेला हा व्हायरस अधिक घातक स्वरूपाचा आहे. स्वाईन फ्लूचा पुढचा अवतार..या नव्या व्हायरसला स्वाईन फ्लू जी 4 असं नाव देण्यात आलंय. अमेरिकन सायन्स जर्नलमध्ये त्याबाबतचा अहवाल प्रकाशित झालाय. 

चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 या कालावधीत 10 राज्यांमधील 30 हजार डुकरांच्या नाकातून विषाणूंचे नमूने घेतले. या नमुन्यांच्या तपासणीअंती चीनमध्ये 179 प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आलीय. त्यातला जी 4 हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगानं आणि गंभीरतेनं पसरू शकेल असा अंदाज संशोधक व्यक्त करतायत. डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला जी 4 चा संसर्ग झाल्याचं समजतंय. सध्या हा व्हायरस मानवामध्ये आला असला तरी एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

पण सध्याच्या कोरोना साथीतच या नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, अशी भीती चिनी संशोधकांनी व्यक्त केलीय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live