शिरुरमधील निवाशी शाळेत ४८ मुली तर ९ शिक्षकांना कोरोनाची लागण

रोहिदास गाडगे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना समुह संसर्ग दिवसेदिवस वाढत असताना शिरुर Shirur शहरात असणा-या एका मुलींच्या निवासी शाळेत ४८ मुलींना आणि ९ शिक्षकांना कोरोनाची Corona लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

शिरुर  : पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना समुह संसर्ग दिवसेदिवस वाढत असताना शिरुर Shirur शहरात असणा-या एका मुलींच्या निवासी शाळेत ४८ मुलींना आणि ९ शिक्षकांना कोरोनाची Corona लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून एक शिक्षक बाहेर गावावरून शाळेत येत होते यावेळी  त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Fifty Seven in Shirun Resident school tested Corona Positive

या निवासी शाळेतील मुली व शिक्षक Teacher अशा ५७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती या अहवालात ५७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे यामधील एका मुलीला शिरुर ग्रामीण रुग्नालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले व इतर ५६ जणांवर शाळेत School उपचार सुरु करण्यात आले असून आरोग्य विभाग व प्रशासनाकडुन शाळेची पहाणी करण्यात आली आहे.

शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला समजली. त्यानंतर या शाळेतील मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अँटिजेन टेस्ट करण्यात आली. Fifty Seven in Shirun Resident school tested Corona Positive

त्यामध्ये या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था केली. शाळेच्या परिसरात नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live