पाच तरुणांनी केले तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार...

विजय पाटील
सोमवार, 31 मे 2021

कोरोनाने मृत झालेल्यांचा अंत्यसंस्काराचा प्रश्न सगळीकडेच गंभीर बनलेला असताना सांगलीच्या आटपाडीत मात्र प्रसाद नलवडे आणि त्याची टीम कसलाही मोबदला न घेता अंत्यसंस्कार करीत आहेत.

सांगली : कोरोनाने Corona मृत झालेल्यांचा अंत्यसंस्काराचा Funeral प्रश्न सगळीकडेच गंभीर बनलेला असताना सांगलीच्या Sangli आटपाडीत मात्र प्रसाद नलवडे आणि त्याची टीम कसलाही मोबदला न घेता अंत्यसंस्कार करीत आहेत. या तरुणाने जीवाची परवा न करता सामाजिक बांधिलकी Social commitment जपत तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन झेडपीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख Amar Singh Deshmukh यांनी या तरुणांची  प्रत्येकी पाच लाखाचा विमा पॉलिसी काढून पोच पावती दिली आहे. fifty two bodies were cremated by five young men

कोरोच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. आटपाडी तालुक्यातही रोज दीडशेवर रुग्ण सापडत आहेत. रुग्ण संख्या वाढल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि उपचार मिळत नाही आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. तर कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची समस्या गंभीर बनली आहे.

हे देखील पहा -

तालुक्यात  एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यात अधिक भर पडली. रक्ताच्या नात्यानी आणि समाजाने पाठ फिरवली असताना आटपाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रसाद नलवडे या तरुणाने पुढाकार घेऊन नातेवाईकांच्या सहकार्याने मोफत अंत्यसंस्काराचे काम सुरू केले. त्याच्या सोबतीला सुरज जाधव, संदेश पाटील, प्रशांत पाटील आणि गणेश जाधव हे तरुण आले. आटपाडी, तासगाव, सांगली, मिरज येथे उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हे तरुण पुढे येत आहेत.नातेवाईकांची अडवणूक न करता कसलाही मोबदला न घेता   अंत्यसंस्कार करतात. fifty two bodies were cremated by five young men

35 वर्षांपासुन पुरुष सेवक अंगणवाडीचे सांभाळ करत आहे

मृतदेह गाडीतून बाहेर काढून चितेवर ठेवून स्वतःच्या हाताने चिता रचत शेवटी अग्नी देत. दोन महिन्यात पाच तरुणांनी तब्बल 52 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. कोविड मृतदेहावर अंत्यसंस्काराच्या मन हेलावून लावणाऱ्या घटना कानावर पडत असताना या तरुणांनी आटपाडीत अजून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live