शिवस्वराज्य दिनीच ग्रामसेविका आणि महिला सरपंच यांच्यात हाणामारी

अभिजीत घोरमारे
रविवार, 6 जून 2021

आज सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाचा कार्यक्रम होता. त्या निमित्त कार्यक्रम आटपुन ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाच्या ठरावावरून वाद झाला.

शिवस्वराज्य दिली महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तूफान हाणामारी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे झाली असून सिलेगाव ग्रामपंचायतिच्या दोन महिला सदस्यासह महिला सरपंच यांनी महिला ग्रामसेविकायांना मारहाण केल्याचा प्रकार उघड़ झाला आहे. सिलेगाव येथील घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुण वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. 

आज सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाच्या कार्यक्रम होता. त्या निमित्त आज कार्यक्रम झाल्यानंतर  ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाचा ठरावा वरून वाद झाला. त्याचबरोबर, प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुण महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्या वाद वाढला. त्यात सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकवन्याचा जाऊ लागल्या त्यावेळी वाद वाढला. यावेळी ग्रामचायत महिला सदस्य महिला मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविका यांना अपशब्द बोलल्याने महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यात तूफान हाणामारी झाली.  (Fight between Gramsevika and woman Sarpanch on Shivswarajya day)  

हे देखील पाहा

सरपंच व इतर सदस्यानी महिला ग्रामसेविका सहारे यांना मारहाण केली. तसेच प्रोसिंडिंग कॉपी हिसकावून नेली. हा वाद अखेर सिहोरा पोलिसात गेला असून तक्रार नोंदविन्यात येत आहे. शिवस्वराजय दिनी महिला पदाधिकारी व अधिकारी मारहाण चर्चेचा विषय ठरत आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live