Mantalalya
Mantalalya

चक्क मंत्रालयातून बोगस लॅबवर कारवाईची फाईल झाली गायब !

मुंबई: बनावट कोरोना (Corona) तपासणी अहवाल तयार करणारी पंढरपूर (Pandharpur) येथील वात्सल्य पॅथॉलॉजी (Pathology) लॅबोरेटरीवर कारवाई करण्यात आली. कारवाई करून ती काल सील करण्यात आली.  असे असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील किमान 8 हजार बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेली फाईल चक्क गायब झाली आहे.  A file for action on fake pathology lab missing from mantralaya

याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनीच (Minister of Medical Education) कबुली दिली आहे. सदरची गहाळ झालेली फाईल रिक्रिएट करून कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्य (State government) पॅथॉलॉजी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ संदीप यादव यांनी केली. 

कोरोनाच्या या महामारी काळात पॅथॉलॉजीच्या रिपोर्टवर रुग्णावर डॉक्टर उपचार करतात. पण काही बोगस पॅथॉलॉजीच्या लॅब वर बोगस रिपोर्ट्स बनवून जिल्याच्या घटना समोर येत आहेत. यावर कारवाई करण्यासाठी बोगस लॅबची यादी असलेली फाईल तयार करण्यात आली होती.

पण धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातून या पॅथॉलॉजी लॅब्स वर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेली फाईलच गायब झाल्याची घटना घडली आहे. याची माहिती महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ संदीप यादव यांनी दिली आहे. या फाईल गायब होण्याच्या घटनेमुळे मंत्रालयातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे बोगस लॅबवर करण्यात येणारी कारवाई मात्र थांबवू नये अशी मागणी केली जात आहे. A file for action on fake pathology lab missing from mantralaya

अशा बोगस लॅबवर कारवाई करावी असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) दिला आहे. मानवी हक्क आयोगाने (Human Rights Commission) याबाबत रुग्णाच्या आरोग्य व आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य शासनाने बोगस लॅबवर कारवाई करावी असे म्हटले आहे.  याबाबत राज्य शासनाने राज्यात किमान 8 हजार बोगस लॅब असल्याचं मान्य केले होते.  पॅथॉलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ संदीप यादव गेल्या 20 वर्षांपासून या विषयावर लढा देत आहेत.

नुकत्याच संपन्न झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात (legislature session) वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सदरची फाईल मंत्रालयात गहाळ झाली असल्याचे कबुल केले आहे.  आता कोरोनाच्या महामारीत शासन व प्रशासन कामकाजात व्यस्त असल्याने अश्या बोगस लॅबने डोके वर लढले असून रुग्णाची आर्थिक लूट होत आहे. सोबतच बोगस लॅबचे रिपोर्ट देखील चुकीचे देऊन रुग्णाच्या जीवाशी खेळ केला जातो आहे. यामुळे राज्य शासनाने सदरची फाईल रिक्रिएट करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पॅथॉलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ संदीप यादव (Sandip Yadav) यांनी केली आहे. A file for action on fake pathology lab missing from mantralaya

राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे राज्यात चार पैसे कमावण्यासाठी बोगस लॅबची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात चुकीच्या रिपोर्टमुळे (Fake reports) होत असलेल्या उपचारा दरम्यान  सर्रास रुग्णाच्या जीवाशी खेळ होतो आहे.  तर दुसरीकडे रुग्ण आणि नातेवाईक यांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. राज्य शासनाने तात्काळ कारवाईचे आदेश देऊन राज्यातील 8 हजार बोगस लॅब्स बंद करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. A file for action on fake pathology lab has been missing from ministry.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com