आमदार रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा...भाजपच्या 'या' नेत्याची मागणी

दिनू गावित
बुधवार, 21 एप्रिल 2021

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर वर गुन्हा दाखल करत असतील तर आमदार रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा असे वक्तव्य नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे

नंदुरबार : महाराष्ट्र Maharashtra राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी अमळनेरचे Amalner माजी आमदार शिरीष चौधरी Shirish Chaudhary यांच्यावर रॅमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वर गुन्हा दाखल करत असतील तर आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यावरही गुन्हा दाखल करा असे वक्तव्य नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.File a case against MLA Rohit Pawar Says BJPs Vijay Chaudhary

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई Mumbai येथे पत्रकार परिषद घेऊन नंदुरबार Nandurbar व अमळनेर येथे रेमडिसिवी Remdisivir इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे असे सांगितले होते. नंदुरबार मधील हिरा पॅलेस येथे सदर इंजेक्शन विकण्यात आले आहे. परंतु रेमडिसिवर Remedies इंजेक्शन बाबत कोणत्याही प्रकारचा काळा बाजार झालेला नसून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे, असे चौधरी म्हणाले.

वेळेत उपचार न मिळाल्याने मुलाच्या डोळ्यांसमोर आईचा मृत्यू

अत्यंत कमी किमतीत हे इंजेक्शन रुग्णांपर्यंत पुरवले आहे. रुग्णांचे प्राण वाचवणे हा गुन्हा असेल तर अवश्य गुन्हा दाखल करा, परंतु माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जसे इंजेक्शन वाटली. त्याचप्रमाणे आमदार रोहित पवार यांनीदेखील त्यांच्या मतदारसंघात इंजेक्‍शन वाटप केले आहे. नवाब मलिक साहेब तुम्ही शिरीष चौधरी याच्या वर गुन्हा दाखल करत असाल, तर आमदार रोहित पवार यांच्या वरही तुम्हाला गुन्हा दाखल करावाच लागेल, असा हल्लाबोल भाजपाचे BJP जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live