Home Isolation: नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल

अरुण जोशी
गुरुवार, 3 जून 2021

 होम आयसोलेशन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती महानगर पालिका क्षेत्राअंतर्गत गृहविलगीकरणात असणारा रुग्ण नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले होते. 
 

अमरावती: होम आयसोलेशन Home Isolation आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका कोरोना Corona रुग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती महानगर पालिका Amravati Municipal Corporation क्षेत्राअंतर्गत गृहविलगीकरणात असणारा रुग्ण नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले होते. महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. Filed a case against a corona patient for violating a home isolation order

विशेष म्हणजे होम आयसोलेशन आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे थेट गुन्हा दाखल झाल्याची हि जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. अमरावती महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशन म्हणजेच गृह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामध्ये रुग्णांना आपल्या घरीच राहून कोरोनाचे उपचार घेता येतात. मात्र, कुठल्याही परिस्थिती रुग्णांना आपल्या घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

आजपासून रत्नागिरीत कडकडीत लाॅकडाऊन

रुग्णांवर देखरेख करण्यासाठी मनपातर्फे भरारी पथकाची Bharari Pathak नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी मनपाच्या पथकाद्वारे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या घराची तपासणी सुरु होती. तपासणी दरम्यान शंकर नगर परिसरातील रहिवासी असलेला पंकज रमेश पोपट (वय ३२) हा रुग्ण घराबाहेर फिरताना आढळून आला. 

हे देखील पहा -

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत, मात्र पंकज यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या होम आयसोलेशन विभागाचे नोडल अधिकारी असलेले डॉ. सचिन बोन्द्रे यांनी सदर कोरोना रुग्ण विरोधात तक्रार दाखल केली आहे. तत्पूर्वी सदर रुग्णावर दंडात्मक कारवाई आणि नोटीस देखील देण्यात आली आहे. डॉ. सचिन बोंद्रे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live