टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी विरोधात गुन्हा दाखल... 

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनीविरोधात मुंबई मधील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोविड-19 विषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत टायगर श्रॉफ, दिशा पाटनी यांच्यासह त्यांच्या मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ Tiger Shroff आणि अभिनेत्री दिशा पाटनी Disha Patni विरोधात मुंबई Mumbai मधील वांद्रे Bandra पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोविड-19 विषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत टायगर श्रॉफ, दिशा पाटनी यांच्यासह त्यांच्या मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. Filed charged against Tiger Shroff and Disha Patni 

दरम्यान, कोरोना Corona संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकांनी एकत्र येऊ नये, आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी मित्रांसोबत Frineds जमल तर तिथे गर्दी होणं हे साहजिकच आहे. चाहते त्यांचं अनुकरण करत असतात. किमान सेलिब्रिटींनी Celebrities तरी भान जपून वागायला पाहिजे अशी प्रतिक्रिया उमटत आहे. 

आमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद- देवेंद्र फडणवीस 

टायगर श्रॉफ आणि आणि दिशा पाटनी त्यांच्या काही मित्रांसह वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरामध्ये फिरण्यासाठी बाहेर पडले. त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी Police त्यांना त्या ठिकाणी रोखलं आणि चौकशीला सुरवात केली. परंतु, कोणतंही योग्य कारण ते सांगू शकले नाहीत, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला. Filed charged against Tiger Shroff and Disha Patni

हे देखील पहा 

मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि त्यांच्या काही मित्रांविरोधात कोविड 19 महामारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. कारण त्यांच्याविरोधात लावलेली कलमं ही जामीनपात्र आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणं गरजेचंच आहे असं नाही. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live