अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

साम टीव्ही
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020
  • अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच
  • सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
  • राज्य परीक्षेविना विद्यार्थ्याना बढती देऊ शकत नाही
  • परीक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते-SC

महत्त्वाची बातमी आहे, शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.  तसंच ३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा आधी घेणं अनिवार्य नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने निकालात सांगितलं. कोरोनामुळे या परिक्षांचा तिढा होता. मात्र उशिरा असल्या तरी या परिक्षा होणार असल्याचं कळतंय.

तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.

पाहा, सविस्तर व्हिडिओ-