लॉकडाऊन मुळे दूध व्यवसायांवर अवकळा, दूधउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

गोविंद साळुंके
रविवार, 6 जून 2021

लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशात दुधाची मागणी घटली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

शिर्डी : लॉकडाऊन Lockdown मुळे संपूर्ण देशात दुधाची मागणी घटली. अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकरी Farmers आर्थिक संकटात सापडला आहे. Financial crisis on dairy farmers 

दुधाचे दर 32 रुपयावरून 22 रुपये झाल्यामुळे ग्रामीण Rural भागात शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात पूरक समजला जाणारा दूध व्यवसाय अडचणीत आल आहे. हा व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

सरकारने दूध व्यवसायला अनुदान द्यावे अशी मागणी दूध उत्पादक करत आहे. कोरोना Corona महामारीमुळे दोन वर्षापासून देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली आणि सर्व हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने दुधाला मागणी राहिली नाही. या परिस्थितीमुळे दूध धंद्यावर अवकळा निर्माण झाला आहे.

स्वयंम सहाय्यता शाळा आर्थिक संकटात, जगण्यासाठी शिक्षकांचा संघर्ष..  

दूध दहा रुपये प्रति लिटर कमी झाले, परंतु खाद्य व जनावरांच्या चारा यांचे भाव Rate कमी न होता ते गगनाला भिडले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दूध दैनंदिन आहारात महत्त्वपूर्ण घटक आहे. ग्रामीण भागात 80 टक्के शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. परंतु, दूध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. Financial crisis on dairy farmers

हे देखील पहा  

मागील महिन्यात दुधाचे दर वाढ झाल्याची परिस्थिती पाहता जनावरांचे खाद्य पुरवठा दर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. पशुखाद्यामध्ये सोयाबीन, शेंगदाणा, सरकी पेंड, यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जनावरांचा सांभाळ करावा की, कोरोना संकटाचा सामना करावा, अशी दुहेरी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे. शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live