कोरोना लसीकरण तुमच्या प्रश्नांची उत्तरे - डॅा संजय पाटील (पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

देशात कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल तर, लसीकरण हा रामबाण उपाय मानलं जातो. त्यामुळे देशामध्ये लसीकरण सुरु झाले आहे.

देशात कोरोनाचा Corona हाहाकार पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल तर, लसीकरण हा रामबाण उपाय मानलं जातो. त्यामुळे देशामध्ये लसीकरण सुरु झाले आहे. सध्या लसीकरणाचा ३ टप्पा सुरु असून, लवकरच ४ टप्पा देखील सुरु होणार आहे. यामध्ये १८ वर्षांवरील वरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. Find out the answers to your questions about corona vaccines

मात्र, लसीकरण घेऊन अनेक प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनात आहेत. तर तंज्ञाकडून नोंदणी पासून ते लसीकरणाच्या परिणामपर्यंत सर्व माहिती घेणार आहोत. त्यासाठी हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डाँ. संजय पाटील.

 प्रश्न : ही नोंदणी कशी करावी ?

उत्तर: सर्वात प्रथम cowin.gov.in या वेबसाइड वर नोंदणी करायची आहे. यामध्ये तुमचा मोबाइलला नंबर टाकून तुमचा OTP टाकून Vaccine Ragistrstion Form भरायचं आहे, आणि नंतर Sehedule Appointment वर क्लिक करून तुमचा पिनकोड टाकायचे आहे. आणि रजिस्टर झाल्यावर त्यामध्ये तुम्ही तुमची तारीख व वेळ ठरवू शकता.

प्रश्न : एखाद्याच्या मोबाइल वरून दुसऱ्या व्यक्तीचे नावची नोंदणी केली तर त्याला लस मिळू शकते का ?

उत्तर :  १  मोबाईल नंबर हा किमान ५ व्यक्तींसाठी वापरू शकतो. Find out the answers to your questions about corona vaccines

प्रश्न : पहिला डोस घेतला आहे आणि दुसरा डोस राहिलेला तर काय ?

उत्तर : घ्यावाच लागेल, कारण आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे दुसरा डोस घ्यावाच लागेल.

प्रश्न : लसीकरण करण्यात वेळेचे काही स्लॉट आहेत का ?

उत्तर : हो. सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंतची वेळ दिली आहे.

प्रश्न : कोविड होऊन गेलेल्या लोकांनी किती दिवसानंतर लस घ्यावी.

उत्तर : २ ते ३ महिन्यानंतर लस घ्यावी. Find out the answers to your questions about corona vaccines

प्रश्न : इतर कोणतेही आजार असलेली व्यक्ती लस घेऊ शकते का ?

उत्तर : हो

प्रश्न : ज्याला व्यक्तीला एच आय व्ही  HIV आहे ती व्यक्ती लस घेऊ शकते का ?

उत्तर :  तंज्ञाच्या सल्ल्याने घ्यावे.

प्रश्न : लस घेतल्यानंतर काही खबरदारी घेण्याची गरज आहे का ? आणि ती कोणती कोणती ?

उत्तर :  नेहमीचा आहार घ्याला पाहिजे. आणि काही अडचण किंवा ताप वगरे असल्यास डाँक्टरांचा घ्याला हवे.

प्रश्न : लस किती सुरक्षित आहे ? मास्क वापरावे का ?

उत्तर : लस निश्चितच सुरक्षित आहे. आणि मास्क हा नेहमी वापरावाचं लागेल.  

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live