जाणून घ्या कुठल्या कुठल्या शहरात लॉकडाऊन

lockdown
lockdown

कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. या पार्श्ववभूमीवर राज्यातील अनेक बड्या शहरात लॉकडाऊन Lockdown लावण्यात येत आहे. यात बारामती, सोलापूर, सांगली, बीड आणि कोल्हापूर अश्या बड्या शहरांचा समावेश आहे.  Find out which cities are locked down

बारामतीत bramati कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे Dadasaheb Kamble यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन  पुढील सात दिवसांसाठी तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी पोलीस यंत्रणेने जास्तीचा सहभाग घ्यावा, अशा सूचना प्रांत अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या लॉकडाऊन दरम्यान, दवाखाने आणि मेडिकल शिवाय कोणत्याही प्रकारची  दुकाने सुरू राहणार नाहीत. दूध आणि वर्तमानपत्र वितरणासाठी मात्र यामध्ये मुभा देण्यात आली आहे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दूध वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

तर साताऱ्यात Satara सुद्धा  कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन Administration कठोर पावले टाकत आहेत. आता सातारा Satara जिल्ह्यातही सकाळी ७ वाजल्यापासून पुढचे ७ दिवस कडक लॉकडाऊन Lockdown लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे Ramchandra Shinde यांनी 'ब्रेक द चेन' अंतर्गत याबाबतचा आदेश जारी केला आहे.जिल्हयात काल संध्याकाळ पासूनच ७ दिवसांचा कडक लॉक डाऊन लावत असल्याची घोषणा पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी केली होती. त्यामुळेच आज जिल्ह्यात कडक लाॅकडाउनला सुरुवात झाली आहे.  Find out which cities are locked down

सांगली मिरज कुपवाड Sangli Miraj Kupwad महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू Jatana Curfew जाहीर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. Janata Curfew in Sangli from Wednesdayबुधवार ता. ५ मे पासून ११ मे पर्यंत मनपाक्षेत्रात कडक जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. बैठकीनंतर याबाबतची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. 

सांगली, कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर आता बीड जिल्ह्यात सुद्धा 3 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवेचे दुकाने खुली ठेवण्यास परवानगी असणार असून उद्यापासून 3 दिवस दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. Find out which cities are locked down

बीड Beed नंतर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा उद्या दुपारपासून 10 दिवसांचा  कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या संदर्भात  माहिती दिली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ Hassan Mushrif, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि या बैठकीत १० दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे  दि. 5 मे सकाळी 11 पासून ते पुढील 10 दिवस हा लॉकडाऊन कायम असणार आहे. त्यानुसार 15 मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com