आता दंडाची रक्कम बँकिंग ऍपद्वारे भरता येणार पुणे शहर पोलिसांचा निर्णय !

pune
pune

पुणे : विविध कारणांसाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या वसुलीत पारदर्शकता आणण्यासाठी पुणे पोलीस विभागाने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पारंपरिक पद्धतीनुसार स्वीकारली जाणारी दंडाची पद्धत आता अपडेट होणार आहे. Fine can now be paid through banking app Pune City Police's decision 

रोख रक्कमेत आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत बऱ्याचदा परस्पर सामंजस्याने फेरफार करण्यात येत होता. मात्र आता दंडाची रक्कम आता गुगल पे,फोन पे अथवा तत्सम बँकिंग ऍपद्वारे स्वीकारली जाणार आहे.

यामुळे अचूक दंड वसुली होणार आहे. यासाठी संबंधित पोलिसांचे गुगल पे व अन्य अ‍ॅपद्वारे होणार्‍या व्यवहारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येणार आहे. त्यामुळे दंड झाल्यास नागरिक आता थेट गुगल अथवा फोन पे सारख्या बँकिंग ऍप च्या माध्यमातून दंड भरू शकणार आहेत. Fine can now be paid through banking app Pune City Police's decision 

पोलिसांमार्फत आता एचडीएफसी बँकेच्या शाखेत स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून पुणे पोलीस दलातील सर्व ३२ पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र कोड यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता क्युआर कोड असणार आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल करण्यात आला आहे त्याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजू शकणार आहे. बऱ्याचदा कॅश नसल्यामुळे पोलीस खाजगी खात्यावर पैसे पाठवायला सांगतात. Fine can now be paid through banking app Pune City Police's decision 

तसेच कॅश मध्ये आकारल्या जाणाऱ्या दंडात मोठ्या प्रमाणावर फेरफार होत असतो. त्यामुळे  आता लोकांना खासगी व्यक्तीच्या नावावर पैसे पाठवावे लागणार नाहीत.येत्या २ ते ३ दिवसात ही योजना प्रत्यक्षात येणार आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com