यवतमाळमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांकडून ५० लाखांचा दंड वसूल 

yavatmal
yavatmal

कोरोनाचा वाढता (Coronavirus) प्रभाव लक्षात घेता राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) घोषित केला होता. सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान अत्यावश्यक सेवा असणाऱ्या व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद होती. या काळात नागरिकांना सर्व काळजी घेत बाहेर पडण्याची मुभा होती. तरीही नियोजित वेळेनंतर पेट्रोल, औषध अशी कारणं सांगून दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.

प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही काही महाभाग विनाकारण वाहनं घेऊन घराबाहेर पडल्याने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. संचारबंदी असूनही काही जण शहरात फिरत असल्याचं पाहून पोलिसांनी प्रत्येक चौकात गाडी अडवून कारवाईला सुरुवात केली.(A fine of Rs 50 lakh has been collected from those who roam in Yavatmal without any reason)

हे देखील पाहा

१ एप्रिल ते ३१ मे या काळात जिल्हा वाहतूक  मोहीम आखली. जिल्हा वाहतूक शाखेने या दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर एकूण २४,७९९ केसेस केल्या. त्यांच्यकडून तब्बल ५० लाख ४६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रशासनाच्या या सक्तीमुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होण्यास बरीच मदत झाली आहे. याचाच काहीसा परिणाम म्हणावा लागेल की पीक पिरेडमध्ये जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज १४०० पर्यंत जात होती.  तीच संख्या आता १०० पर्यंत येऊन पोहचली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com