तुमची बोटं ठरवणार कोरोनाचा धोका? पाहा काय आहे आगळं वेगळं संशोधन

साम टीव्ही
बुधवार, 27 मे 2020

बोटांची लांबी ठरवणार मृत्यूचा धोका?
कोरोनाच्या धोक्याचे संकेत तुमच्या बोटात?
कोरोनाबाबत वैज्ञानिकांचं वेगळं संशोधन

कोरोनाबाबत जगभरामध्ये संशोधन सुरु आहे. आणि या संशोधनातून आता एक वेगळी माहिती समोर आलेय.  कोरोनामुळे तुम्हाला मृत्यूचा धोका किती आहे? याचा अंदाज तुमच्या बोटाच्या लांबीवरुन येऊ शकतोय. काय आहे हा दावा.. तुम्हीच पाहा..

 कोरोनाबाबत वैज्ञानिकांनी एक वेगळं संशोधन केलंय. तुमच्या बोटांच्या लांबीवरुन कोरोनामुळे तुम्हाला मृत्यूचा धोका किती आहे, हे कळू शकणार आहे. यूकेच्या वेल्समधील स्वानसी विद्यापीठात हे संशोधन करण्यात आलंय.

यातला दावा नेमका काया आहे, पाहुयात...
 बोटांची लांबी ठरवणार मृत्यूचा धोका?

  • 41 देशांतील रुग्णांच्या डेटाचं हे विश्लेषण आहे
  • यात 2,274 कोरोना रुग्णांचा समावेश आहे 
  • हा दावा केवळ पुरुष रुग्णांशी संबंधित आहे
  • ज्या पुरुषांचं अनामिका बोट लांब आहे त्यांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका तुलनेनं कमी आहे
  • अशा पुरुषांमध्ये कोरोनाची लक्षणंही सौम्य असू शकतात

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया मलेशिया, रशिया,  मेक्सिको आणि पूर्व आशियातील लोकांचं अनामिका बोट हे जास्त लांबीचं असतं, त्यामुळे इथल्या पुरुषांना कोरोनाचा धोका कमी आहे. असा दावा या अहवालानंतर करण्यात आलाय. या दाव्यामागे अर्थातच विज्ञान आहे.

कोरोनावर जगभरात संशोधन सुरु आहे. त्यातूनच दरदिवशी समोर येणारी ही माहिती अर्थातच यातलं काही संशोधन दिलासा देऊन जातं तर काही चिंता वाढवून जातं... ज्यांचं अनामिक बोट मोठं आहे त्यांच्यासाठी हा दिलासाच म्हणावा लागेल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live