मुंब्रा येथे रुग्णालयात आग; चौघांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयाला पहाटे आग लागली होती. मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंब्रा : ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयाला पहाटे आग लागली होती. मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.Fire in Mumbra Hospital Three Patients dead

या रुग्णालयात २० जण उपचार घेत होते. या रुग्णांपैकी ६ रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत होते. या सहा रुग्णांना जवळच्या बिलाल रुग्णालयात हलविण्यात आले. तर अन्य काही रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयातील लागलेली आग विझविण्यात यश आले आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live