BREAKING | पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला आग, अग्निशमनच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

साम टीव्ही
गुरुवार, 21 जानेवारी 2021

हडपसरमधील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागलीय. मांजरीतील गोपाळपट्टीतील प्लॅन्टला आग लागली असून आग लागलेल्या या इमारतीत BCG लशीचं उत्पादन केलं जातं.

हडपसरमधील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागलीय. मांजरीतील गोपाळपट्टीतील प्लॅन्टला आग लागली असून आग लागलेल्या या इमारतीत BCG लशीचं उत्पादन केलं जातं.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून, फायर ब्रिगेडच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग लागलेल्या इमारतीतल्या तीन कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढलंय. दरम्यान कोरोनावरील कोव्हिशील्ड या लशीचं उत्पादन SEZ 3 या इमारतीत होत असून ही इमारत सुरक्षित असल्याने कोव्हिशील्ड लशीचा साठाही सुरक्षित असल्याची माहिती सीरमच्या व्यवस्थापनाने दिलीय.

 

Video | मेट्रो आहे की डान्सबार? मेट्रोमधील ही दृष्य बघाल तर चकित व्हाल!

मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सीरमच्या कोविशील्ड लसीला संपूर्ण जगात मोठी मागणी आहे. असं असताना ही लागल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. मात्र तरीही लसीचा साठा सुरक्षित असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. 

पाहा या आगीचा हा व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live