Breaking चाकणमध्ये टाटा कंपनीच्या कंटेनर यार्डला आग; १५ गाड्या खाक

रोहिदास गाडगे
रविवार, 18 एप्रिल 2021

चाकण औद्योगिक वसाहतीमधील  वाकी येथे टाटा डी एल टी कंपनीच्या कंटेनर यार्डला आज आग लागल्याची घटना घडली आहे कंपनीच्या बाजूला असणाऱ्या माळरानाला लागलेल्या वणव्यामुळे कन्टेनर यार्ड मधील गाड्यांना आग असून या घटनेमध्ये १५ कंटेनर गाड्या जळून खाक झाल्या आहेत

चाकण पुणे, : चाकण औद्योगिक वसाहतीमधील Chakan MIDC वाकी येथे टाटा Tata डी एल टी कंपनीच्या कंटेनर यार्डला आज आग Fire लागल्याची घटना घडली आहे कंपनीच्या बाजूला असणाऱ्या माळरानाला लागलेल्या वणव्यामुळे कन्टेनर यार्ड मधील गाड्यांना आग असून या घटनेमध्ये १५ कंटेनर गाड्या जळून खाक झाल्या आहेत. Fire at Tata Company Container Yard at pune Chakan

टाटा डी एल टी कंपनी च्या बाजूला असणाऱ्या माळरानाला वणवा पेटला होता. हा वणवा थेट कंपनीच्या कंटेनर यार्डमध्ये येऊन पोहोचला व काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले या घटनेत कंटेनर गाड्या जळून खाक झाल्या असून कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजगुरुनगर Rajgurunagar नगरपरिषद,खेड सेझ, चाकण एमआयडीसी अग्निशामक दलाच्या Fire Brigade ३ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र धुराचे लोट असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत आहेत.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live