पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले ( पहा व्हिडिओ )

गोपाल मोटघरे
बुधवार, 12 मे 2021

विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळ घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

पिंपरी -पिंपरीमध्ये Pimpiri आज एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना बुधवारी Wednesday (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड Chinchwad स्टेशन जवळ घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. Firing near MLA  Anna Bansode's office

आरोपीने पिस्तुलातून Gun गोळ्या झाडल्या असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चिंचवड स्टेशन येथे आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात ठेकेदाराच्या एका माणसाकडून गोळीबार Firing बुधवारी दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली .

कोरोना पॉझिटिव्ह दांपत्याच्या मुलींना सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांचा आधार

या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेचा तपस सुरु केला. याप्रकरणी पोलिसांनी तानाजी पवार नामक इसमला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त केले आहे. गोळीबार का केला, आरोपीकडे शस्त्र कुठून आले , याचा शोध आता पोलिस घेत आहेत. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस पुढील  तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live