पहिल्यांदाच घडली आश्चर्यकारक घटना : कोविड - १९ चे एंटीबॉडीज असलेल्या बाळाचा जन्म

सिद्धी चासकर
शुक्रवार, 19 मार्च 2021

कोरोना माहामारीमुळे गेल्या एका वर्षभरापासून सगळीकडे भयान वातावरण निर्माण झाल आहे.  

कोरोना माहामारीमुळे गेल्या एका वर्षभरापासून सगळीकडे भयान वातावरण निर्माण झाल आहे. अशा भयान वातावरणात बाळाला जन्म देण्याबाबत प्रत्येक पालकांच्या मनात भीतीचं निर्माण झाली होती. कोरोनाच्या या संकटात एक आश्चर्यकारक माहिती समोर आली, एका महिलेला तिच्या गर्भधारणेदरम्यान कोविड -१९ लसीचा पहिला डोस दिला गेला होता, ज्यामुळे जन्माला आलेलं बाळ हे कोविड १९ च्या एंटीबॉडीजसह जन्माला आलं आहे. अशी आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

या बाळाच्या आईला मॉडर्ना (MRNA) लसीचा डोस दिता होता, हा एक डोस ३६ आठवड्यात आणि तिच्या गर्भधारणेच्या तीन दिवसात मिळाला असल्याने तीन आठवड्यांनंतर या महिलेनं एका निरोगी मुलीला जन्म दिला. ह्या निरोगी बाळाच्या रक्ताचे नमुने जन्मानंतर ताबडतोब घेतले त्यानंतर ह्या रक्कताच्या नमुन्यात सार्स- कोव्ह-2 व्हायरसविरूद्ध फाईट करण्याचे अँटीबॉडीज दिसून आले

हे अँटीबॉडीज कशावरून दिसून आले ? तर कोविड-रिकव्हर्ड मातांकडून प्लेसेंटामार्फत त्यांच्या गर्भाकडे एंन्टीबॉडीज येणे अपेक्षेपेक्षा कमीवेळा होते मात्र सध्याच्या संशोधनात असे दिसून आले आहे की मातेला लसीकरण केल्यानंतर सार्स -कोव्ह -२ मधील संरक्षण आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.त्याच बरोबर , गिलबर आणि रुडनिक यांनी नमूद केले की लसीकरण केलेल्या मातांच्या जन्मलेल्या बाळांमध्ये एंटिबॉडी प्रतिसादाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी आणखीन रिसर्च करावा लागणार आहे.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live