जुन्नर तालुक्यात आढळला म्यूकोरमायकोसिसचा पहिला रूग्ण.

रोहिदास गाडगे
गुरुवार, 13 मे 2021

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावात ६५ वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन दिवसांनी बुरशीजन्य आजार म्यूकोरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची घटना समोर झाली आहे.

पुणे : कोरोना Corona  महामारीच्या संकटाला तोंड देत असतानाच आता नव्या आजाराचा सामना करण्याची वेळ जगावर आली आहे. म्यूकोरमायकोसिस Mucormycosis या आजाराचा फैलाव आता सगळीकडे होऊ लागल्याचे आता समोर येत आहे. The First Case of Mucormycosis Found in Junnar

जुन्नर Junnar  तालुक्यातील धनगरवाडी गावात ६५ वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन दिवसांनी बुरशीजन्य आजार म्यूकोरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची घटना समोर झाली आहे. आज सकाळी नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या अथर्व नेत्रालय नारायणगाव येथे डोळे तपासणीसाठी आले असता ही बाब निदर्शनास आली आहे.  

कोरोना नंतर साधारणपणे मधुमेह असणाऱ्यांना या आजाराची लागण होते. यात नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्याला लाली येते. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो परंतु दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन ही बुरशी मेंदूपर्यंत पोचते व रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. The First Case of Mucormycosis Found in Junnar

 हे देखील पहा -

त्यामुळे कोरोना नंतर न डोळे व नाका संबंधी काही तक्रारी आढळल्यास तात्काळ संबंधित तज्ञांना दाखवणे गरजेचे आहे असे डॉक्टर मनोहर डोळे नेत्र रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संदीप डोळे यांनी सांगितले. या आजारात घाबरून न जाता प्रथमोपचार करणे गरजेचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस उपनिरीक्षक परीक्षार्थींना प्रशिक्षणास पाठवणार

कोरोना ने अगोदरच हाहाकार माजवला असतानाच  म्यूकोरमायकोसिस नावाच्या बुरशीजन्य आजाराचे आगमनही आता पुणे Pune जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाले आहे त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे.

Edited By : Krushnarav Sathe

 


संबंधित बातम्या

Saam TV Live