महाराष्ट्राला गुंतवणूकदारांपैकी देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के- सुभाष देसाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबई - मागील पाच वर्षांत राज्यात तीन लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

देशातील उत्पन्नात राज्याचा १४.९३ टक्के वाटा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची मागील पाच वर्षांत सरासरी वाढ नऊ टक्के होती. देशातील औद्योगिक उत्पादन व नक्त मूल्यवृद्धीमध्ये राज्याचा २० टक्के वाटा आहे.

सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा ५५ टक्के आहे. केंद्र सरकारच्या उद्योगसंवर्धन व आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार २०१४ ते  मार्च २०१९ अखेरपर्यंत एक हजार ७९४ एवढ्या औद्योगिक उपक्रमांनी केंद्र सरकारकडे औद्योगिक उद्योजकांचे ज्ञापन सादर केलेले असून, याद्वारे दोन लाख ४६ हजार ९१५ कोटी गुंतवणूक झालेली असून, त्यामधून ५.४० लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.

राज्यात विशाल प्रकल्प धोरण जाहीर झाल्यापासून ६४३ विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे ४.७९ लाख कोटी गुंतवणूक व ५.२२ लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहेच.
- डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव, माहिती उद्योग

Web Title: First choice of investors to Maharashtra Subhash Desai
 
संबंधित बातम्या

Saam TV Live