भारतात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना व्हेरियंटचे WHO ने केले नामकरण

coronavirus.jpg
coronavirus.jpg

नवी दिल्ली : कोरोना Corona विषाणूच्या सर्व व्हेरियंट / स्ट्रेनचे जागतिक आरोग्य संघटनेनं WHO नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोणत्याही प्रकारच्या कोरोना विषाणूचे नाव संबंधित देशांशी जोडण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर हा विषाणूच्या प्रकारांना नावं दिली आहेत. The first corona variant found in India was named by WHO

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात India सापडलेल्या B.1.617.2 या कोरोना विषाणूला Coronavirus Variant असे नवे नाव दिले आहे. परंतु आता हा विषाणू डेल्टा Delta या नावाने ओळखला जाईल. ब्रिटनमध्ये डिसेंबर 2020 मध्ये सापडलेल्या B.1.1.7 या व्हेरियंटला अल्फा Alpha म्हणून संबोधण्यात येणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेतील South Africa B.1.351 हा विषाणू Beta असे नाव देण्यात आले आहे. आणि नोव्हेंबर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेतच सापडलेल्या P.1 व्हेरिएंटसाठी आता गामा Gamma हे नाव निश्चित करण्यात आलेले आहे. 

देशातील सोशल मीडिया Social Media कंपन्यांना आपापल्या व्यासपीठावरून इंडियन व्हेरिएंट हा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने Central Government  दिले होते.

यामध्ये, सर्वप्रथम भारतात आढळलेल्या करोना व्हेरियंट B.1.617 या विषाणूच्या प्रकाराला 'डेल्टा व्हेरियंट' Delta Variant असं नाव देण्यात आले आहे. सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेनं याची जाहीर घोषणा केली आहे. करोनाचा हा व्हेरियंट आतापर्यंत ५३ देशांत आढळून आला आहे.  The first corona variant found in India was named by WHO

जागतिक पातळीवर 'भारतीय व्हेरियंट' म्हटलं गेल्यानंतर कोरोनाच्या B.1.617 हा प्रकाराला भारताने १२ मे रोजी याला आक्षेप घेतला होता. विषाणूच्या कोणताही कोरोना स्ट्रेन कोणत्याही देशाच्या नावाने ओळखला जाऊ नये, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले होते.

हे देखील पाह -

'डेल्टा व्हेरियंट' जो सर्वप्रथम भारतात आढळलेला होता तो तीव्र आणि संक्रामक असल्याचं समोर आले आहे. 

WHO ने सांगितल्यानुसार, 'डेल्टा व्हेरियंट' पूर्वी भारतात आढळलेल्या व्हेरियंटला कप्पा Kappa असे नाव दिले जाईल. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा भारतात हा व्हेरियंट गेल्या वर्षी आढळला होता. या व्हेरियंटने देखील जगातील ५० हून अधिक देशांत हातपाय पसरले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड- १९ तांत्रिक प्रमुख डॉ. मारिया वान केरखोवे यांनी  सांगितल्याप्रमाने, या नव्या नामकरणामुळे कोरोना विषाणूच्या सध्याच्या वैज्ञानिक नावांत बदल होणार नाही. कारण ते वैज्ञानिक तथ्य आणि शोधावर आधारित असलेले नावे आहेत.  SARS-CoV-2 या कोरोना विषाणूचं वैज्ञानिक नाव आणि शोध अगोदर प्रमाणेच सुरू राहील. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com