कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार, याच आठवड्यात मानवी चाचणी होणार...

साम टीव्ही
मंगळवार, 30 जून 2020
  •  
  • देशात कोरोनाची पहिली लस तयार
  • जुलैच्या पहिल्या आठवड्यात मानवी चाचणी
  • भारत बायोटेकच्या लसीनं सर्वांच्या आशा पल्लवित

आता बातमी कोरोना संकटात सर्वांच्या आशा पल्लवित करणारी.  कोरोनावर लस कधी येणार याचीच प्रतीक्षा अनेकजण करतायेत. आता ही प्रतीक्षा संपणार आहे... कोरोनावरील पहिली लस भारतात तयार होतेय. पाहुया खास रिपोर्ट

देशात कोरोना रुग्णांचा आकडा ५ लाखांवर गेलाय. दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडतंय. एकूणच देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चाललीय...या संकटात एक चांगली बातमी आहे. कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीनं केलाय. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लसीची मानवी चाचणी  करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये वेगळा केला गेलाय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला.  हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बायोसेफ्टी लेव्हल ३ ही लस तयार करण्यात आलीय. प्री-क्लिनिकल स्टडी आणि इम्यून रिस्पॉन्स अहवालानंतर  डीसीजीआयकडून लसीच्या फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीला परवानगी मिळालीय.

भारत बायोटेक हैदराबादमधील कंपनी आहे... कंपनीचा लस बनवण्याचा मोठा अनुभव आहे.आतापर्यंत कंपनीने पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर लस बनवल्या आहेत. त्यामुळे बायोसेफ्टी लेव्हल ३कडून मोठी अपेक्षा आहे. कोरोनावर ही लस प्रभावी ठरली तर देशात तयार होणारी पहिली लस ठरणार आहे.असं झालं तर कोरोना संकटात भारतीयांसाठीच नाही तर जगासाठी मोठी देणगी ठरणार आहे


संबंधित बातम्या

Saam TV Live