मनसेच्या पुढाकारातून पंढरपुरात उभारले राज्यातील पहिले कोविड हाॅस्पिटल ( पहा व्हिडिओ )

manse news
manse news

पंढरपूर - राज्यात आणि सोलापूर Solapur जिल्ह्यात कोरोना Corona रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सेवा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. अशा संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS येथील नागरिकांच्या वैद्यकीय मदतीसाठी Help धावून आली आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर राज्यातील पहिले कोविड हाॅस्पिटल पंढरपुरात Pandharpur सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या हाॅस्पिटलमध्ये पत्रकारांवर Reporter  मोफत उपचार केले जाणार आहेत. The first covid Hospital was set up in Pandharpur by the initiative of MNS

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे  Dilip Dhotre आणि नगरपालिकेचे माजी  उपनगराध्यक्ष नागेश भोसले Nagesh Bhosle यांनी पुढाकार घेवून स्वखर्चातून 150 बेडचे पल्स कोविड हाॅस्पिटल Hospital सुरू केले आहे. आज सकाळी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे  Bank अध्यक्ष ब्रिजलाल मोदी व प्रांताधिकारी सचिन ढोले  Sachin Dhole यांच्या हस्ते या कोविड हाॅस्पिटलचे उदघाटन करण्यात आले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकी नंतर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येने सोलापूर जिल्ह्यात  उच्चांक गाठला आहे. येथे दररोज सरासारी 300 हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडू लागली आहे. परिणामी येथील शासकीय आणि खासगी वैद्यकीय सेवेवर कमालीचा ताण आला आहे. पंढरपुरात वैदयकीय उपचार मिळत नसल्याने रुग्णांना सोलापूर, सांगली, पुणे, मिरज आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागते.  लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशातच कोरोनाच्या वैद्यकीय खर्चामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. The first covid Hospital was set up in Pandharpur by the initiative of MNS

गरीब व गरजू रुग्णांवर माफक दरात आणि वेळेवर कोरोनाचे उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व त्यांच्या काही सहकार्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून कोविड हाॅस्पिटल सुरु केले आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचे 50 बेड तयार करण्यात आले आहेत.  शिवाय येथील रुग्णांना दोन वेळचे जेवन, नाष्टा, चहा आणि आवश्यक त्या सोयी सुविधा  ही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या वैद्यकीय सेवेमुळे  परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळात कोरोना योध्दे म्हणून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून  काम करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील  अनेक पत्रकार हे  कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर अनेक पत्रकारांना कर्ज काढून उपचार घ्यावे लागले. पत्रकारांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेवून येथील हाॅस्पिटलमध्ये पत्रकारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. हाॅस्पिलटमध्ये पत्रकारांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आल्याचेही मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com