आधी जगाला कोरोना दिला, आता कपटी चीनची घुसखोरीची तयारी

साम टीव्ही
रविवार, 24 मे 2020

 

  • लडाखमध्ये भारतीय-चिनी सैन्य आमनेसामने
  • भारतीय हद्दीत घुसखोरी कऱण्याचा लालची चिनचा प्रयत्न
  • आधी जगाला कोरोना दिला, आता घुसखोरीची तयारी

एकीकडे चिनी कोरोना व्हायरसशी जग झुंजतंय. भारत झुंजतोय पण त्यातच लालची चीननं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय. लडाखमधून भारतीय हद्दीत चीनी सैनिक घुसखोरी करायचा प्रयत्न करतायंत. इतकंच नाही तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीननं सैन्याची जमवाजमव सुरु केलीय.

 'लाल'ची चीनची चाल

अक्साई चीनला लागून असलेल्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात निर्माण झालेला तणाव कमी होताना दिसत नाहीये. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून 80 तंबू उभारले गेल्याचं सॅटेलाईट छायाचित्रातून स्पष्टपणे दिसतंय. भारतीय सेनेकडूनही या ठिकाणी चिनच्या 80 तंबूंना प्रत्युत्तर म्हणून 60 तंबू उभारण्यात आलेत. इतकंच नाही तर लालची चीन या ठिकाणी खंदक खोदण्याचं सामान आयात करण्याचे फोटोही समोर आलेत.

पैंगोंग त्सो लेक आणि फिंगर एरिया परिसरात भारतीय आणि चीनी सैन्य मोठ्या प्रमाणावर जमायला सुरुवात झालीय. चीननं या सगळ्याची सुरुवात केली. भारतीय सेनेच्या एका पेट्रोलिंग पार्टीला बंदी बनवायचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय पेट्रोलिंग पार्टीवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी बेधुंद चीनी सैनिकांना पिटाळून लावलं पण त्यानंतर चीननं तातडीनं या ठिकाणी जमवाजमव सुरु केली. नकू ला पास इथे तर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक,हातघाई झाल्याचाही बातम्या येतायंत. 

तणाव इतका आहे की भारतीय लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी लेह स्थित 14 कॉर्प्स मुख्यालयाचा दौरा केला. लडाखसह अक्साई चीनला लागून असलेल्या भागात चीनपेक्षा भारतच मजबूत स्थितीत आहे. 2017मध्येही डोकलाम परिसरात चीननं अशाच पद्धतीनं कुरापती काढत भारताला चिथवायचा प्रयत्न केला होता. तेव्हाही भारतानं संयमीपणे परिस्थिती हाताळली होती. कोरोनाशी लढणाऱ्या भारताला चिथावण्यासाठीच चीन ही कृती करतोय, असा सूर उघडपणे उमटायला सुरुवात झालीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live