महाराष्ट्र पोलीस खात्यातील पहिल्या मराठी अधिकाऱ्याने केले एव्हरेस्ट शिखर सर

everest.
everest.

सांगली - पोलीस Police उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च पर्वतरांग उंची ८८४८ मिटर असलेल्या एव्हरेस्ट Everest  शिखराला गवसणी घातली आहे. संभाजी गुरव Sambhaji Gurav हे  सांगली  Sangli जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथील आहेत. जगातील सर्वोच्च शिखर सर करणारे वाळवा तालुक्यातील हे पहिले पोलीस अधिकारी पहिले आहेत. संभाजी गुरव हे महाराष्ट्र Maharshtra पोलीस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहीले मराठी तर सुहेल शर्मा आणि रफीक शेख यांच्यानंतर तिसरे अधिकारी आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्र पोलीस खात्यातील पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासामध्ये नाव नोंद झाली आहे. The first officer from Maharashtra Police Department climbed Everest 

हे देखील पहा -

पोलीस उपनिरीक्षक असलेल्या संभाजी गुरव यांनी २०१९ मध्ये सर्वात आधी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. ऑक्सीजन सिलेंडर वगैरे सर्व साहित्य बरोबर असूनही त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ न दिल्यामुळे त्यांना एव्हरेस्ट शिखर अर्ध्यावर सोडून माघारी परतावे लागले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार केला.

त्यांनी नियमित अवघड पर्वत सर करण्याचे प्रयत्न चालु ठेवले. आणखी एकदा त्यांनी प्रयत्न केला पण तरीही  त्यांना यश आले नाही. नंतर त्यांनी ६ एप्रिल रोजी ते एव्हरेस्ट  मोहीमेसाठी मुंबईहुन निघाले, एव्हरेस्ट   शिखर मोहिमेवर २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी सकाळी ७ वाजुन ४५ मिनिटांनी भारताचा राष्ट्रध्वज रोवला. त्यांना तिसऱ्यांदा शिखर सर करण्यात यश आले. वाळवा तालुक्यामध्ये त्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. The first officer from Maharashtra Police Department climbed Everest 

पोलीस इन्स्पेक्टर असलेले संभाजी गुरव हे सध्या मुंबई पनवेल येथे कार्यरत आहेत.एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांच्याकडे पाहिले जाते. शालेय जीवनापासुनच ते जिद्दी आणि धाडशी विद्यार्थी म्हणुन ओळखले जातात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com