राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पॅरिस - फ्रान्सबरोबर राफेल करार झाल्यानंतर पहिले राफेल लढाऊ विमान आज भारतीय हवाई दलाला ताब्यात मिळाले. फ्रान्समधील डॅसाल्ट एव्हिएशन या विमाननिर्मिती कंपनीच्या उत्पादन केंद्रात एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील हवाई दलाच्या पथकाने विमान स्वीकारले. चौधरी यांनी विमानातून तासभर उड्डाणही केले.

हे विमान अधिकृतपणे आठ ऑक्‍टोबरला पॅरिसमधील एका कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत हवाई दलात दाखल केले जाणार आहे. विमाने भारताच्या ताब्यात आली तरी त्यात भारताच्या गरजेनुसार सुधारणा करून आणि वैमानिकांना प्रशिक्षण दिल्यानंतर ती पुढील वर्षी मे महिन्यापासून भारतात दाखल होणार आहेत. भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमान खरेदीचा करार केला आहे. आज ताब्यात घेतलेल्या विमानाचा टेल नंबर आरबी-01 असा आहे. हवाई दलप्रमुख पदासाठी निवड झालेले एअर मार्शल आर. के. एस. भदोरिया यांच्या सन्मानार्थ हा क्रमांक देण्यात आला आहे. राफेल करारात भदोरिया यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

Web Title: First rafael plane India

संबंधित बातम्या

Saam TV Live