पहिली कसोटी दुसरा दिवस: भारताचे वर्चस्व आणि अधिक मासाचे वाण घ्यायला सासुरवाडीला आलेला लॅबुशेन

पहिली कसोटी दुसरा दिवस: भारताचे वर्चस्व आणि अधिक मासाचे वाण घ्यायला सासुरवाडीला आलेला लॅबुशेन

 पिंक बॉलवर टिकून चांगला स्कोर उभा करणे अवघड असते ह्याची चर्चा आपण कालच्या लेखात केली होती. सकाळी भारताचा डाव पटकन आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करताना पिंक बॉलच्या करामती मुळे पहिली धाव काढायला 28 चेंडू लागले. हे गेल्या शंभर वर्षात झाले नव्हते असे कळले. पिंक बॉल in the air आणि off the wicket भाकित न करता येणाऱ्या गोष्टी करतो. बॅट्समन ला नेहमीची आक्रमक बॅटिंग करणे जोखमीचे असते.अगदी ऑस्ट्रेलिया च्या बॅट्समनला सुद्धा. त्यामुळे आज ऑस्ट्रेलिया ने दोन रन प्रति ओव्हर ह्या रेट ने बॅटिंग केली ह्यात पिंक बॉलच्या वागणुकीचे योगदान होते.त्याला ऑस्ट्रेलियाचा भ्याडपणा म्हणणे उगाच टप्पल मारून पळून जाण्यासारखे आहे.

पिंक चेंडू बरोबर खेळपट्टी काय करतीये हे ही पहायला हवे.रहाणे, विहारी, मॅथ्यू वेड आणि लॅबुशेन ह्या चौघांचे lbw पाहिले तर लक्षात येईल की बॅट्समन पोजीशन मध्ये येण्याआधी बॉल पॅडवर येऊन आदळला.ह्याचा अर्थ खेळपट्टी नक्की शार्प आहे. मोठी लॅटरल movement पहायला मिळाली नसली तरी डोळ्याला विलक्षण सुखावणारी लेट movement ऑफ स्टंप च्या कॉरिडॉर मध्ये मिळतीये. काही चेंडू अनपेक्षित खाली राहिले आहेत.स्पिन तर लायन आणि अश्विन दोघांना मिळाला आहे. एकंदर चौथ्या इंनिंग मध्ये ऑस्ट्रेलियाला भारत जे टार्गेट देईल ते चेस करणं जिकरीचे असणार आहे. ऑस्ट्रेलीयाला out of the game करता येण्यासाठी भारताचा उद्या किमान 80 ओव्हर्स खेळण्याचा प्लॅन डोक्यात असेल. प्लॅन करणे आणि तो यशस्वी होणे ह्यात पिंक बॉल वर मध्ये बरेच अडथळे असतात हे ही प्रेक्षकांच्या लक्षात असले पाहिजे. 

भारताने आज छान बॉलिंग केली. टीम पेन ला जीवदान नसते दिले तर त्याच्या 73 धावा आणि लॅबुशेनला तीन जीवदानाचे  अधिक मासाचे वाण दिले नसते तर ऑस्ट्रेलियाचा 120 होणे मुश्किल होते. विकेट कीपर आणि स्लिप्स यांच्या पुढे कॅचेस पडूनही ते शेवटपर्यंत स्टंप पासून बरेच लांबच दिसत होते. इयन बोथम स्लिप मध्ये विकेट कीपरच्या बराच पुढे उभा रहायचा.तो म्हणायचा मी खूप स्पीडनी झेल आला तरी घेईन पण झेल पुढे पडू देणार नाही. भारताच्या  फिल्डिंग कोच ने ह्यावर निर्णय घ्यायला हवा.
 
उमेशने लेग स्टंप लाईनला सोडण्याची चांगली प्रॅक्टिस केली आहे हे पाहून बरे वाटले. चारही बॉलर्स ने विकेट्स शेअर करायला हव्यात. शमीने 100%चेंडू सिमवर टाकून त्याचा वरचा क्लास दाखवून दिला.बुमराह दुसऱ्या स्पेलला कमी स्पीड ने टाकत होता.चौथ्या इंनिंग मध्ये तिथे तडजोड होऊ नये ही अपेक्षा आहे.अश्विन ने त्याची त्याची आणि लायन पेक्षा वेगळी middle स्टंप लाईन घेऊनही मी विकेट्स काढून दाखवतो हे दाखवले. त्याची variations लायनपेक्षा वेगळी असतात. पण अजूनही त्याला बाऊन्स मिळत नाही जे ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर प्रमुख अस्त्र असते.

एकंदर आजचा दिवस भारताचा होता. उद्याचा दिवस नवा.फासे नव्याने पडणार. भारत वरचढ स्थितीत आहे पण ऑस्ट्रेलिया घरच्या conditions मध्ये खेळतोय हे लक्षात असले पाहिजे.त्यामुळे अक्षता पडल्या शिवाय बँड वाल्यांना 'सुरू करा' ची खुण मांडवातून करायला नको.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com