मच्छिमारांना व्हेलच्या पोटात मिळाली दुर्मिळ वस्तु;  किंमत 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

समुद्रात  मासेमारी करून उदरनिर्वाह करणे हा तेथील प्रमुख व्यवसाय आहे.  पण  याच समुद्रात मच्छिमारांना सोन्याचा खजिनाच सापडला आहे. एका मेलेल्या स्पर्म व्हेल माशाच्या पोटातून निघालेल्या एका  दुर्मिळ वस्तुमुळे या मच्छिमारांना लॉटरी लागल्याचे म्हणायला हवे. 

वृत्तसंस्था  : एका मेलेल्या माशाद्वारे तुम्ही करोडो रुपये कामावू शकता, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही. पण अलीकडेच एक अशी घटना समोर आली आहे.  एका मेलेल्या  व्हेल माशाद्वारे काही मच्छिमार लखपती  झाले आहेत.  ही घटना आहे येमेन देशातली. खरंतर येमेन हा देश गरीब देश म्हणून ओळखला जातो. समुद्रात  मासेमारी करून उदरनिर्वाह करणे हा तेथील प्रमुख व्यवसाय आहे.  पण  याच समुद्रात तेथील मच्छिमारांना सोन्याचा खजिनाच सापडला आहे. एका मेलेल्या स्पर्म  व्हेल माशाच्या पोटातून निघालेल्या एका  दुर्मिळ वस्तुमुळे या मच्छिमारांना लॉटरी लागल्याचे म्हणायला हवे.   (Fishermen find rare items in whale's stomach; Price more than Rs 11 crore) 

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण येमेनच्या Yemen  अल-खैसा येथील येथील मच्छीमारांना समुद्रात एका व्हेलचा मृतदेह सापडला.  हा अवाढव्य मृत व्हेलमासा WhaleFish मच्छीमारांनी किनाऱ्यावर आणला. या माशाला कापल्यानंतर त्यांना व्हेलच्या पोटात 127 किलोचा  ''अंबरग्रीस'' Ambergris  आढळून आला.  आता तुम्ही म्हणाल, हे अंबरग्रीस  काय असतं, अंबरग्रीस म्हणजे व्हेल मशाची उलटी. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण व्हेलच्या उलटीच्या एक किलोची  किंमत 35 हजार पौंड म्हणजेच 36 लाखांहून अधिक आहे. तर ज्या मच्छीमारांना  अंबरग्रीस सापडले त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली,  127 किलोच्या या अंबरग्रीसमधून त्यांनी तब्बल 11 लाख पौंड म्हणजेच 11 कोटीरुपयांपेक्षा जास्त पसे कमावले.  मच्छीमाराणी व्हेलची उलटी विकून मिळालेला नका समप्रमाणात वाटून घेतला आणि उलेलेल्या काही पैसातून त्यांनी तो आपल्या गरीब समाजालाही दान केला. भारतातही व्हेलच्या एक किलो उलटीची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे. 

फक्त घोषणाबाजी नाही,  शिवसेना आधी काम करते;  श्रीकांत शिंदे यांचा भाजपला...

अंबरग्रीस : समुद्रात  तरंगणारे सोने
अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटीला जगभरातील शास्त्रज्ञ समुद्रात  तरंगणारे सोने असे म्हणतात. यांचे कारणही तसेच आहे. अंबरग्रीस हा माशाच्या पोटातील एक मेणासारखा ठोस ज्वलनशील पदार्थ आहे.  समुरात मोठे मासे लहान माशाना खातात. व्हेलदेखील पण्यातील धारदर चोच किंवा शेल्स असणाऱ्या जीवांना खात असतात. हे खाल्ल्यानंतर व्हेलच्या पोटातील  यातील भागासत इजा होऊ नये म्हणून त्यात  अंबरग्रीस असते. ही मिळवण्यासाठी आणि अंबरग्रीस ची तस्करी करण्यासाठी अनेक मच्छीमार व्हेलशी शिकार करत आहेत. यामुळे व्हेल माशांची प्रजाती हळूहळू विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 

तथापि, आता युद्धग्रस्त येमेनमधील या लोकांचे जीवन बदलू लागले आहे. चांगल्या प्रकारची घरे आणि वाहनांपासून मूलभूत गरजा यात पूर्ण होऊ शकतात.  अंबरग्रीस अत्यंत मौल्यवान मानले जाते. याचा  उपयोग  परफ्यूम, अत्तर  उद्योगात केला जातो. त्यामध्ये असलेल्या अल्कोहोलचा वापर महागड्या ब्रँड्सचे  अत्तर आणि परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने, परफ्यूमचा सुगंध  बराच काळ टिकवून ठेवता येतो. यामुळे, त्याची किंमत खूप जास्त आहे. अगदी वैज्ञानिकांनीकही  त्याला तरंगणारे सोने  असे म्हणतात. तथापि,  थायलंडच्या ज्या मच्छीमाराळ हा अंबरग्रीस मिळाले आहे, त्याची  गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आल्यास  व्यापऱ्याने त्याला  25 कोटी रुपयांची देण्याचे मान्य केले आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live