पाचशे लिटर गावठी दारू पोलिसांनी केली नष्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 सप्टेंबर 2019

मरखेल (नांदेड) : सीमावर्ती भागातील दारूबंदीवर मरखेल पोलिसांनी गेल्या काही दिवसांत अवैध दारूविक्रीवर धाडसत्र सुरू केल्याचे दिसून आले.

दरम्यान, रविवारी (ता. २९) रोजी पहाटे पाचच्या सुमारास लोणीतांडा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलूर, मरखेल व मुक्रमाबाद पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पाचशे लिटर गावठी दारू, रसायन पोलिसांनी नष्ट केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलूर पोलिसांचे राखीव पथक, मुक्रमाबाद पोलीस यांच्या संयुक्तिक कार्यवाहीत लोणीतांडा येथे पहाटे पाच वाजता कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले. सदर कार्यवाहीत गावठी दारूचे गाळप व विक्री करणाऱ्या लोकांच्या घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये गावठी दारूनिर्मितीसाठी ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे ५०० लिटर दारू रसायन, सडवा पोलिसांनी ताब्यात घेऊन जागेवर नष्ट केले.

तसेच दारू बनविण्याच्या साहित्यांची नासधूस करून विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणावर दारूविक्रेत्यांवर कार्यवाही केल्याचे दिसून येत आहे. उपरोक्त कार्यवाहीत रसायन हे तांड्याजवळील गावतलावाजवळ मिळाले असल्याने त्यासंदर्भात नावे शोधून संबंधितांवर गुन्हे नोंदविणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक लोणीकर यांनी दिली आहे.

Web Title: Five hundred liters of alcohol and chemicals destroyed in nanded
 
संबंधित बातम्या

Saam TV Live