ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या आणखी पाच नव्या लसी येणार... 

Corona Vaccine
Corona Vaccine

नवी दिल्ली :  गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना Corona बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज कोरोनाच्या १ लाखाहून अधिक रुग्णांची Patients नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणखी पाच लसींना Corona Vaccine मंजुरी देण्याची शक्यता आहे. Five More Vaccines will be Available in Country by October

सध्याच्या घडीला दोन लसींचा वापर केला जात आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा वापर देशभरात सुरू आहे. देशात लसीकरणानं वेग घेतला असला तरी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आणखी पाच लसींना लवकरच मान्यता दिली जाईल.

नव्या लसींमध्ये डॉ. रेड्डीजच्या Dr. Reddy's सहकार्यानं तयार होत असलेल्या स्पुटनिक व्ही, बायोलॉजिकल ईच्या सहकार्यानं तयार होत असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस, सीरम इन्स्टिट्युट आॅफ इंडियाच्या Serum Institute सहकार्यानं तयार होत असलेल्या नोवोवॅक्स, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेकच्या Bharat Biotech इंट्रानसल यांचा समावेश आहे. Five More Vaccines will be Available in Country by October

कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली जात असताना, केंद्र सरकारकडून सुरक्षा आणि परिणामकारकता यांचा प्राधान्यानं विचार केला जातो. रशियाच्या Russia स्पुटनिक व्ही लसीला पुढील १० दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जूनपर्यंत स्पुटनिक लस उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिलाची लस ऑगस्टपर्यंत, तर नोवोवॅक्स सप्टेंबरपर्यंत आणि भारत बायोटेक इंट्रानसल लस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com