बीड जिल्ह्यातील तलावावर अवतरले फ्लेमिंगो पक्षी 

बीड जिल्ह्यातील तलावावर अवतरले फ्लेमिंगो पक्षी 

बीड जिल्ह्यातील मुरंबी लघुसिंचन तलावावर फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचाही ओढा तलावाकडे वाढला आहे.

तालुक्‍यातील मुरंबी लघुसिंचन तलावावर स्थलांतरित परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले. याची माहिती मिळताच सोमवारी (ता. 20) सायंकाळी पक्षीमित्र व हौशी छायाचित्रकारांनी तलावाकडे धाव घेऊन या पक्ष्यांचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले. 

मुरंबी तलाव एकप्रकारे पक्ष्यांसाठी वरदानच आहे. यंदा परतीचा पाऊस बरसल्याने तलावात 40 टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. हा तलाव उथळ असल्याने पक्ष्यांना खाद्य मिळण्यासाठी फायदेशीर ठरतो. तलावाच्या काठावर जमा झालेले शेवाळ, विविध प्रकारचे कीटक, मासे हे खाद्य त्यांना भरपूर उपलब्ध होते. विदेशी फ्लेमिंगो पक्षी येण्याचेही कारण तेच आहे. 


तलावावर स्थलांतरित व स्वदेशी असे विविध प्रकारचे पक्षी असतात. तलावात पाणी असल्यावर या ठिकाणी पक्ष्यांची शाळाच भरते. त्यात सामान्य करकोचा, पट्टकदंब, साधा क्रौंच, नॉर्दन पिंटेल, लहान बगळा, नॉर्दन शॉव्हरल, चित्रबलाक अशा विविध पक्ष्यांचा रहिवास असल्याने या तलावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पाऊस संपला की, ऑक्‍टोबर महिन्यापासून स्थलांतरित पक्षी या तलावावर यायला सुरवात होते. यंदा प्रथमच फ्लेमिंगो पक्षी इथे आल्याने परिसराच्या वैभवातही भर पडली आहे. 


पाझर तलाव असला तरी, त्यातून शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपशावर मर्यादा असायला हव्यात. उन्हाळ्यात पाणी राहण्यासाठी शेतीसाठी ठिबक संच लावूनच पाणी घेतले पाहिजे. तरच उन्हाळ्यातही पक्षी राहू शकतील.


Web Title: Flamingo Birds Land On A Lake In Beed District

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com