मंत्र्यांच्या समाेरच त्याने केला पत्नीला व्हिडीओ कॉल अन्...

विजय पाटील
मंगळवार, 10 मार्च 2020

जयंत पाटील यांनी या कुटुंबाचा प्रश्न समजून घेत सोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित कुटुंबाचे नाव लिहून घेण्यास सांगत तात्काळ समस्येची सोडवणूक करण्याचे आदेशदिले.

इस्लामपूर (ता. वाळवा, जिल्हा सांगली) : येथील रेठरे हरणाक्ष गावच्या हसन हकीम या तरुणाला बोलता येत नाही. मागील वर्षी आलेल्या पूरात संपूर्ण घरदार उद्ध्वस्त झाले आहे. घरी आई आणि पत्नी असते. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपल्या समस्येचे हमखास निवारण होईल या आपेक्षेने हा तरुण जयंत पाटील यांना भेटण्यासाठी आला; मात्र त्याला आपल्या समस्या मंत्र्यांकडे मांडताच येईना. मग तरुणाने शक्कल लढवत जयंत पाटील यांच्यासमोरच पत्नीला व्हिडीओ कॉल लावला. जयंत पाटील यांनीही फोनवर काही प्रश्न विचारत समस्या जाणून घेतली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना समस्येची सोडवणूक करण्याचे तत्काळ आदेश दिले.

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

मागील वर्षी झालेल्या महाप्रलयंकारी पूरात अनेक घरांची पडझड झाली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यापैकीच एक हकीम कुटुंबीय. या कुटुंबाला राज्य सरकारची ९५ हजारची मदत तर झाली; मात्र केंद्राकडून येणारी मदत अद्यापही प्रलंबित आहे. मदत अपुरी असल्याने हसन हकीम आणि त्यांच्या पत्नीने यांनी थेट जयंत पाटील यांच्याकडे दाद मागितली. जयंत पाटील यांनी या कुटुंबाचा प्रश्न समजून घेत सोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित कुटुंबाचे नाव लिहून घेण्यास सांगत तात्काळ समस्येची सोडवणूक करण्याचे आदेश दिले. प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार रविंद्र सबनीस उपस्थित होते.

 

हेही पाहा - BREAKING | पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले

हेही पाहा -  कर्जमाफीसाठी ठाकरे सरकारच्या जाचक अटी! मृत शेतकऱ्याचा अंगठा कुठून आणायचा?
 

हेही पाहा - खूशखबर! पेट्रोल प्रतिलिटर 50 रुपयांना मिळणार?

Web Title: Flood Affected Family Asked Jayant Patil To Help


संबंधित बातम्या

Saam TV Live