रांजणगावच्या महागणपतीला केळीची आरास व फुलांची सजावट

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

अष्टविनायक महागणपतीला बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त केळीची आरास व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर नागरिकांना दर्शनासाठी बंद असले तरी सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे नागरिकांनी महागणपतीचे दर्शन घेतले आहे. 

तळेगाव:  शिरूर (Shirur) रांजणगाव (Ranjangaon) गणपती येथील अष्टविनायक महागणपतीला (Lord Ganesh) बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त केळीची आरास व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रष्टतर्फे महागणपतीचे मंदिर नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र मंदिर बंद असले तरी ट्रष्ट तर्फे महागणपतीची अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. Flower decoration to Mahaganapati of Ranjangaon

संकष्टी चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी (Farmer) नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मुख्य गाभारा व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आली आहे. तसेच पाथर्डी (Pathardi) येथील निखिल मंडले या नागरिकाकडून श्री महागणपतीला १०१ डझन केळींची (Banana) आरास करण्यात आली होती. मंदिर नागरिकांना दर्शनासाठी बंद असले तरी सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे नागरिकांनी महागणपतीचे अप्रत्यक्ष दर्शन घेतले. गणपतीची आकर्षक सजावट पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

संकष्ट चतुर्थीनिमित्त रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळेस देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संतोष दुंडे,  नारायण पाचुंदकर, विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व  प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. Flower decoration to Mahaganapati of Ranjangaon.

Edited by- Sanika Gade. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live