धुक्यामुळे बेळगावातील वीज पुरवठ्यावर परिणाम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

बेळगाव - शहर आणि परिसरात आज पहाटे दाट धुके पडले होते. याचा परिणाम वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य लाइनवर झाला. सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी धारवाड व बेळगावला वीज पुरवठा करणारी मुख्य लाइन ट्रिप झाली. त्यामुळे संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित झाला.

बेळगाव - शहर आणि परिसरात आज पहाटे दाट धुके पडले होते. याचा परिणाम वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य लाइनवर झाला. सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी धारवाड व बेळगावला वीज पुरवठा करणारी मुख्य लाइन ट्रिप झाली. त्यामुळे संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित झाला.

अलारवाड गावाजवळ धुक्यामुळे इन्सुलेटर खराब झाल्याचे  दिसून आले. त्यानंतर त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीचे पूर्ण झाल्यानंतर दुपारी एक वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला, मात्र पुन्हा बिघाड निर्माण झाल्यामुळे 45 मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेऊन 2 वाजता वीज पुरवठा सुरू करण्यात आला. बिघाड निर्माण झाल्यामुळे तब्बल 8 तास वीज पुरवठयावर परिणाम झाला   

दरम्यान घटप्रभा आणि अंकलगी येथील वीज पुरवठा केंद्रातून शहराला वीज पुरवठा करण्याची वेळ हेस्कॉमवर आली. धुक्यामुळे निर्माण झालेला बिघाड दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला आठ तासांचा कालावधी लागला.

पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बुधवारी शहरात पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंडळाने दिली आहे.

दाट धुके पडले तर  वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. मंगळवारी सकाळी 5 नंतर अलारवाड गावाजवळ इन्सुलेटर तुटले होते त्यामुळे समस्या निर्माण झाली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे शहराच्या सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे

- अश्विन शिंदे, सहायक कार्यकारी अभियंता हेस्कॉम

Web Title: fog affects on electricity distribution in Belgaum


संबंधित बातम्या

Saam TV Live