कोरोनाचे नियम पाळा,अन्यथा आपले दुकान सील... 

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा विक्रोप झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची विक्रमी संख्या वाढ होत आहे

औसा : महाराष्ट्रात कोरोनाचा (Maharashtra Corona) पुन्हा एकदा विकोप झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस लातूर (Latur) जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची विक्रमी संख्या वाढ होत आहे. Follow Corona's rules otherwise your shop will be sealed warns Latur Administration

औसा शहरात कोरोनाचा विस्फोट होतो की काय अशी स्थिती निर्माण होत आहे.  दरम्यान औसा नगर पालिकेने सर्व दुकानदारांना कोरोना चाचणीची करून घेण्याची सक्ती करण्यात आली होती, पण अद्यापही काही दुकानदारांनी स्वतःचे व दुकानातील कामगारांच्या कोरोना चाचण्या करून घेतल्या नाहीत. यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

औसा शहरातील सर्व दुकानदार व कामगारांची कोरोना चाचणी (Corona Test) करून घेण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.  आतापर्यंत 550 दुकानदारांनी कोरोना चाचण्या केल्या, असून उर्वरित दुकानदारांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे चित्र दिसून आले आहे. यासाठी आज पासून औसा इथल्या नगर पालिकेच्या वतीने दुकानंदारावर कारवाई करण्यात येणार असून कोरोनाचे नियम न पाळल्यास  दुकाने सील करण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण  यांनी सांगितले आहे. Follow Corona's rules otherwise your shop will be sealed warns Latur Administration

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live